Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मे ०८, २०२३

मोरारजी टेक्सटाईल्सच्या कामगारांचे कामबंद आंदोलन सुरूच | Strike by workers of Morarji Textiles


नागपूर : पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र बुटीबोरीतील मोरारजी टेक्सटाईल्स  (Morarjee Textiles is the global leader in premium cotton shirting fabrics and high fashion printed fabrics. )कंपनीतील कामगारांना चार महिन्यांपासून पगार, बोनस, ले ऑफ वेतन मिळालेला नाही. २६ दिवस काम न देऊन कामगारांना मानसिक त्रास दिला जात आहे. तसेच निलंबित कामगारांना कामावर घेतले जात नाही. कंपनी व्यवस्थापनापुढे १३ दिवसांपासून या मागण्यांसह विविध मागण्या ठेवण्यात आल्या. मागण्यांवर काहीच विचार न झाल्याने दोन हजारावर स्थायी व अस्थायी महिला, पुरुष कामगारांनी १७ एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

कंपनीला चांगला नफा मिळत असताना व्यवस्थापनाने चार महिन्यांपासून वेतन न दिल्याने स्थायी व आस्थायी कामगारांवार उपासमारीची पाळी आली आहे. त्यांना चार महिन्यांचा पगार मिळालेला नाही. अशा स्थितीत घरभाडे, मुलांचे शिक्षण व परिवाराचा उदरनिर्वाह असे अनेक प्रश्न समोर आहेत. 'जगावे की मरावे' अशी कामगारांची मानसिकता झाली आहे. राज्याचे माजी जलसंपदा, शालेय शिक्षण महिला बालविकास व कामगार मंत्री बच्चू कडू यानी दि २ फेब्रु. २०२१ ला अप्पर कामगार आयुक्त बी. रा. पाणबुडे, सरकारी कामगार अधिकारी संजय धात्रक तसेच Morarjee Textiles Ltd कंपनीचे जनरल मॅनेजर तुषार व्यवहारे, आयईसी व एव्हीएमचे संचालक सुबोध मोहिते, एच आर मॅनेजर प्रकाश शर्मा यांच्यात कंपनी व कामगार यांच्या समे घडवून आणण्यासाठी बैठक झाली.
कामगारांच्या सर्व मागण्यांवर चर्चा करून त्या पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु कंपनीच्या आडमु धोरणाने कामगार मंत्र्यांच्या आदेशाल केराची टोपली दाखविली होती. नंत बच्चू कडू यांनी दि. १ मे २०२२ ल बुटीबोरी येथे कामगारांचा आनंद कामगार मेळावा घेतला. कामगारांचे भोंगे बंद पडू देणार नाही, अर्श घोषणासुद्धा केली होती. त्यानंतर ऑक्टो. २०२२ ला मोराराज कंपनीचा भोंगा बंद पडला व आतासुद्ध तो बंदच आहे. हिंगणेचे आमदार समीर मेघे यांनीही उपोषण करते आणि आंदोलन कर्त्या कामगारांची भेट घेऊन त्यांना आश्वस्त केले कंपनी व्यवस्थापना सोबत चर्चा घडवून आणू असे आश्वासन दिले. मात्र 20 दिवसांचा कालावधी लोटूनही अद्यापही कामगारांच्या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही.

Morarjee Textiles is the global leader in premium cotton shirting fabrics and high fashion printed fabrics. Established in 1871, The Morarjee Goculdas Spinning & Weaving Co. Ltd. is the oldest textile company in India. It is one of the first five companies to be listed in the Indian Stock Exchange market.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.