कारंजा(घा) राष्ट्रीय महामार्गावर Road Car Accident बेजबाबदारपणे मध्यरात्री च्या सुमारास रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या ट्रेलरला दुचाकींची मागून धडक लागल्याने दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले, हा अपघात दि,4 गुरुवार ला रात्री दीड च्या सुमारास घडला.
चंदेवाणी फाटा येथील श्रीहरी लॉन येथिल कार्यक्रम आटोपून आपल्या गावाकडे दुचाकी क्र. MH-40 AA 4605 ने परत येत असताना बोरी फाट्यानाजीक रस्त्याच्या मधोमध चालकाने बेजबाबदारपणे उभ्या करून ठेवलेल्या ट्रेलर ला मागून दुचाकींची धडक लागल्याने सावळी( खुर्द) या गावातील चंद्रशेखर दिग्रसे व अंकुश ढोबाळे वय 26 हे डोक्याला जबर मार लागल्याने जागीच ठार झाले. Road Car Accident
मध्यरात्री रस्त्याच्या मधोमध ट्रेलर उभा करून झोपी गेलेल्या चालकाने गाडीचे पार्किंग लाईट, रिफ्लेक्टर, व इंडिकेटर लाईट कोणतेही चालू करून ठेवले नव्हते, त्यामुळे दुचाकी चालवत असलेल्या चंद्रशेखर दिग्रसे ला रस्त्यावर उभा असलेला ट्रेलर दिसून आला नाही, व त्यामुळे दुचाकी ट्रेलर वर धडकल्याने हा अपघात झाला, अंकुश ढोबाळे हा कारंजा येथील फोटो स्टुडिओत काम करायचा, या अपघाताची माहिती महामार्गावरील आशीर्वाद हॉटेल येथे कामावर असलेले उमराव ढोबाळे यांना एका व्यक्तीने येऊन सांगताच त्यांनी घटनास्थळाला जाऊन पाहिले असता त्यांचा मुलगा अंकुश ढोबाळे हा रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे दिसून आले, Road Car Accident
त्यांनी कारंजा पोलीस स्टेशन ला जात या अपघाताची माहिती दिली, कारंजा पोलीस स्टेशन ला या अपघाताची नोंद करण्यात आली असून आरोपी ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
उभ्या ट्रेलरला दुचाकीची धडक;एकाचा मृत्यू Road Car Accident
उमेश तिवारी/कारंजा (घा):
नागपूर वरून अमरावतीकडे जात असताना उभ्या ट्रेलरला धडक बसल्याने दुचाकी स्वराचा मृत्यू झाला. हि घटना सोमवारी संध्याकाळी ७ वाजत्याच्या दरम्यान कारंजा (घाडगे) वरून ९ किलोमीटर दूर राष्ट्रीय महामार्गवर काटोल फाट्याजवळ घडली. सागर पुरुषोत्तम ढोले वय २९ वर्ष राहणार बोरगाव जिल्हा वर्धा असे या मृत्यू मुखी पडलेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. ट्रेलर क्र. CG.04.HT.9912 रस्त्यावर उभा होता. दुचाकी स्वार सागर पुरुषोत्तम ढोले दुचाकी क्र. MH.32.AA.0356 नागपूर वरून गावाला जात असतांना ट्रेलरच्या मागे येऊन धडकला.आणि तो खाली पडला. या नंतर तत्काळ कारंजा येथून रुग्णवाहिका बोलवण्यात आली व कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारा करिता आणले असता रुग्णालयातच सागर ढोले याचा मृत्यू झाला.