मुलच्या त्या घटनेतील आरोपी निघाले भद्रावतीच्या दुहेरी हत्याकांडातील हत्यारे | Bhadravati double murder
आपल्या शेतालगत असलेल्या मंदिरात झोपून असलेल्या दोन शेतकऱ्यांची हत्या करून मंदिरातील दानपेटी लंपास करणाऱ्या एकास अटक करण्यात आली आहे. चंद्रपूर गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणात आणखी आरोपी असण्याची शक्यता आहे. (The accused in that incident of the child turned out to be the killers of Bhadravati's double murder)
भद्रावती तालुक्यातील मांगली शेतशिवारात 22 मार्च रोजी मधुकर खुजे ( ७०) व बाबुराव खारकर (६०) या दोघांची हत्या झाली होती.
मांगली गावापासून काही अंतरावर जगन्नाथ बाबा मंदिर आहे. या मंदिराला लागूनच दोघांचे शेत आहे. त्यामुळे शेताची राखण करण्यासाठी ते रोज येत होते व मंदिरात झोपत होते. दरम्यान, 22 मार्च रोजीच्या रात्री अज्ञात दरोडेखोरांनी या दोन्ही शेतकऱ्यांवर हल्ला चढवून जागीच ठार केले आणि मंदिरातील दानपेटी घेऊन पोबारा केला. ही दान पेटी फोडलेल्या अवस्थेत मंदिरापासून काही अंतरावर आढळून आली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. यात या भागात रात्रीच्या सुमारास मोबाईल करणाऱ्यांचा तपास करण्यात आला.
मोबाईल लोकेशनच्या आधारावर या आरोपींपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. तेव्हा आरोपी मंदिर परिसरातून रात्रीच्या सुमारास फोन केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्या आजारावर या आरोपी पर्यंत पोहोचून शोध घेण्यात आला असता या आरोपीने मुल येथील बियर बार मध्येही दरोडा घातल्याचे उघड झाले आहे. पोलीस त्याच्या मागावर असताना हा आरोपी भंडारा जिल्ह्यातील लाखनी परिसरामध्ये न्यायालयाच्या समोर सापडला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून, आरोपीला ताब्यात घेऊन चंद्रपूर येथे आणण्यात आले आहे.
सदर आरोपीस मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी भद्रावती यांचे न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली असुन गुन्हयातील इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
- Blog Comments
- Facebook Comments