20 रुपयात काढा 2 लक्षाचा विमा
अपघातात उपयोगी – प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
दैनंदिन धावपळीच्या जीवनात आयुष्य महत्वाचे आहे. अनावधाने अपघात झाल्यास अशा वेळी पूर्ण कुंटुंबावर त्याचा परिणाम होतो. कुटुंबाची आर्थिक स्थिती खालवली असल्याने अशा वेळी प्रधानमंत्री सुरक्षा योजना अत्यंत लाभदायी ठरणार आहे. या योजनेचा विमा हप्ता केवळ 20 रुपये असून अपघातात पूर्णत: अपंगत्व आल्यास 2 लक्ष रुपये व आंशिक अपगंत्व आल्यास 1 लक्ष रुपये मिळतात. बॅक खातेधारकांनी आपल्या बँकेत साधा अर्ज करावा. खात्यातून आपोआप ही विम्याची रक्कम वर्ग करण्यात येते. राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी उपक्रमात प्रत्येक बँकेत हा अर्ज भरुन घेण्याची सूचना आहे. जनतेने याचा लाभ घ्यावा.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PRADHAN MANTRI SURAKSHA BIMA YOJANA) केंद्र शासनाची अपघात विमा योजना असून मे 2015 पासून ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेचा विमा हप्ता 13 रुपये होता त्यामध्ये वाढ करुन आता फक्त 20 रुपये करण्यात आला आहे. भारताच्या फक्त 20 टक्के लोकांजवळच कोणत्याना कोणत्या प्रकारचा विमा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या योजनेंतर्गत 11 लक्ष लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेची व्याप्ती वाढविण्याकरीता जास्तीत जास्त बँक खातेदारांनी यामध्ये सहभागी व्हावे हा मूळ ध्येय आहे.
विमा कोणास अनुज्ञेय याबाबत थोडक्यात माहिती : 18 ते 70 वयोगटातील सर्व व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात, लाभार्थ्याचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे. योजनेसाठी वार्षिक हप्ता 20 रुपये असून तो दरवर्षी लाभार्थ्याच्या बँकखात्यातून आपोआप वर्ग होईल, हप्त्यासाठी आर्थिक वर्षे 1 जून ते 31 मे असेल. प्रत्येक बँकेत या संदर्भातील अर्ज आहे. खाते असणाऱ्या प्रत्येकाने हा अर्ज करणे आवश्यक आहे.
Pradhan Mantri Suraksha Bima Yojana(PMSBY)
वैशिष्ट्ये
1. लक्ष्यगट - अपघात विमा न नोंदवलेले सर्व नागरिक
2. वय व पात्रता - 18 ते 70 वयोगटातील सर्व व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात, लाभार्थ्याचे बँकेत खाते असणे जरुरीचे आहे.
3. हप्ता- योजनेसाठी वार्षिक हप्ता 20 रुपये असून तो दरवर्षी लाभार्थ्याच्या बँकखात्यातून आपोआप वर्ग होईल, हप्त्यासाठी आर्थिक वर्षे 1 जून ते 3 मे असेल.
4. विमा लाभ - लाभार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसदाराला 2 लाख रुपये अर्थसाहाय्य मिळेल, लाभार्थ्याला अपघातामुळे पूर्ण अपंगत्व आल्यास 2 लक्ष रुपये व आंशिक अपंगत्व आल्यास 1 लक्ष रुपये अर्थसाहाय्य दिले जाते .
5. खाते ऑटो व डेबिट करण्याची सुविधा या योजनेमध्ये आहे. योजना न्यू इंडिया एश्योरेंस कंपनीशी संलग्नित आहे.
6. व्यवस्थापन - योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी एल आय सी किंवा कोणत्याही विमा कंपनीत खाते उघडू शकतो.
‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांमध्ये प्रत्येक बँकेने हा अर्ज भरुन घ्यावा. केवळ 20 रुपये खात्यातून कपात होणाऱ्या या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, आवाहन असे जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक मोहित गेडाम यांनी केले आहे.
सुनिलदत्त जांभुळे, उपसंपादक,
जिल्हा माहिती कार्यालय, नागपूर
Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY) is a government-backed accident insurance scheme in India. It was launched by Prime Minister Narendra Modi on 8 May 2015. The scheme provides accidental death and disability cover of ₹2 lakh to all eligible individuals in the age group of 18 to 70 years. The annual premium for the scheme is ₹20, which is deducted from the account holder's bank account through auto-debit facility.
The scheme is available to all individuals with a bank account who give their consent to join the scheme on or before 31 May for the coverage period 1 June to 31 May on an annual renewal basis. Aadhar would be the primary KYC for the bank account.
The scheme is being offered by Public Sector General Insurance Companies or any other General Insurance Company who are willing to offer the product on similar terms with necessary approvals and tie up with banks for this purpose.
- The following are the key features of the Pradhan Mantri Suraksha Bima Yojana:Accidental death and disability cover of ₹2 lakh
- Annual premium of ₹20
- Available to individuals in the age group of 18 to 70 years
The Pradhan Mantri Suraksha Bima Yojana is a very beneficial scheme for individuals and their families. It provides much-needed financial support in the event of an accident. The scheme is also very affordable, with an annual premium of just ₹20. I would encourage all eligible individuals to take advantage of this scheme and protect themselves and their families from the financial burden of an accident.
Here are the steps on how to enroll in the Pradhan Mantri Suraksha Bima Yojana:Go to your nearest bank branch.
- Fill up the enrollment form.
- Provide your Aadhaar card.
- Pay the annual premium of ₹20.
- Your enrollment will be complete.
If you have any questions about the Pradhan Mantri Suraksha Bima Yojana, you can contact your nearest bank branch or the insurance company that is offering the scheme.