गावकऱ्यांनी एकत्रित येऊन आदर्श ग्राम निर्माण करा; कीर्तनकार नयनपाल महाराज शिंदोलाकर
हडस्ती : दारू, तंबाखू, बिडी या वाईट व्यसनाचा करून त्याग गावकऱ्यांनी एकत्रित आले पाहिजे. आई वडिलांनी मुलांना चांगले संस्कार देऊन, वाईट गोष्टीपासून दूर ठेवले पाहिजे. ज्यांच्यामुळे या देशाला संविधान मिळाले असे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक वाचले पाहिजे.व मुलींनी सावित्रीबाई,
जिजामाता, रमाई, भिमाई, अहिल्याबाई होळकर यांची पुस्तके वाचणे काळाची गरज आहे व श्री सद्दगुरू जगन्नाथ बाबा यांचे वीचार पुढे घेयुण जाणाची गरज आहे. असे नयनपाल महाराज शिंदोलाकर यांनी आपल्या कीर्तनातून लोकांना सांगितले.
बल्लारपुर तालुक्यातील हडस्ती येथे सत्यपाल महाराज यांचे शिष्य संदीपपाल महाराज यांचे शिष्य समाज प्रबोधनकार नयनपाल महाराज शिंदोलाकर(राष्ट्रीय सप्तखंजेरी वादक प्रबोधनकार तथा विद्रोही लेखक कवी) (सप्त खंजेरी वादक ) यांचा जाहीर कीर्तनाचा प्रबोधनात्मक कार्यक्रम हनुमान मंदिर मंडळ हडस्ती येथे बुधवार ला सायंकाळच्या सुमारास पार पडला. सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व गावातिल मुलिनि स्वागत गीत गायुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन मारोती वाढई , सुरेश गौरकार यांनी केले. सूत्रसंचालन राधीका वाढई यांनी केले. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मारोती महाराज व घेमराज महाराज पावडे आणी उद्घाटक गावचॆ पोलीस पाटिल कीशोर मेश्राम व गावचे जेष्ठ नागरीक यादव पिपंळशेंडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंढरी खोके, घनश्याम वाढई, मोरेश्वर डवरे, सुधाकर भोयर, भास्कर थीपे, प्रशांत अटकारे आदींनी व गावातिल नागरीकानि सहकार्य केले.