Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल २७, २०२३

पायलट प्रशिक्षणार्थी वैष्णवीची मेंदू विकाराशी झुंज | Pilot trainee Vaishnavi's battle with brain disorder


पायलट प्रशिक्षणार्थी वैष्णवीची मेंदू विकाराशी झुंज


वडील अल्पभूधारक शेतकरी, घरची परिस्थिती हलाखीची या कठीण संघर्षमय जीवनमानातून मार्ग काढून अभ्यासुवृत्ती, जिद्द व चिकाटीच्या बळावर गरुड झेप घेणाऱ्या ब्रह्मपुरी येथील "पायलट प्रशिक्षणार्थी' वैष्णवी सतीश उराडे (vaishnavi satish urade) ही यशाची शिखर गाठण्याच्या उंबरठ्यावर असताना तिला मेंदू विकाराचा गंभीर आजार जडला. अशातच वैद्यकीय उपचारादरम्यान डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला देत सहा लाख रुपयांचा खर्च सांगितल्यानंतर हतबल झालेल्या उराडे कुटुंबीयांना सुचेनासे झाले. अशा केविलवाण्या परिस्थितीत कुराडे कुटुंबीयांची व्यथा जाणून घेतली.  यावेळी आमदार विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) मित्र मंडळातील सर्व सहकाऱ्यांनी तीळमात्र ही वेळ न घालवता तिच्या उपचाराकरिता 85 हजार रुपयांची रोख मदत उपलब्ध करून दिली.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील मागासवर्गीय बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी समजून घेत महाज्योती संस्थेला बळकट करून अनेक  नावीन्यपूर्ण योजना सुरू केल्या होत्या.  ओबीसी विद्यार्थ्यांना पायलट प्रशिक्षण देण्याची योजना सुद्धा आम्ही राबविली होती. अशाच प्रशिक्षणापैकी एक असलेल्या पायलट प्रशिक्षणार्थी म्हणून ब्रह्मपुरी येथील  कुर्झा वॉर्डांत राहणाऱ्या अल्पभूधारक शेतकरी सतीश उराडे यांची कन्या वैष्णवी उराडे हिने आपली अभ्यासू वृत्ती जिद्द व चिकाटीच्या बळावर परीक्षेमध्ये यश संपादन करून महाज्योती अंतर्गत सुरू झालेल्या पायलट प्रशिक्षण या क्षेत्रात करियर घडवण्याची महत्त्वकांक्षा ठेवत प्रवेश केला. या प्रशिक्षणा अंतर्गत वैष्णवीला मेंदू विकाराचा गंभीर आजार जडला. घरची परिस्थिती हलाखीची असताना कसेबसे शिक्षण पूर्ण करून आकाशात उंच झेप घेण्याची महत्वकांक्षा बाळगत संघर्षमय जीवनातून वाट काढू पाहणाऱ्या उराडे कुटुंबीयांवर पुनश्च एकदा दुःखाचे डोंगर कोसळले. वैष्णवीला मेंदू विकाराच्या गंभीर आजारांतर्गत उपचाराकरिता नागपूर येथील श्रीकृष्ण हृदयालय या इस्पितळात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीअंती डॉक्टरांनी तिला ब्रेन हॅमरेज या गंभीर आजारा अंतर्गत शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. 

आता शस्त्रक्रियेसाठी आवश्यक पैश्यांची उपलब्धता झाली असून वैष्णवीच्या शस्त्रक्रियेचा मार्ग सुकर झाला आहे.  लवकरच तिच्यावर शस्त्रक्रिया होऊन तिचे पायलट होण्याचे स्वप्न अधांतरी न राहता पुनर्जीवित झाले ह्याचा आनंद आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.