नागपूर - चंद्रपूर महामार्गावर घोडपेठ जवळ कोल्ह्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून, ही घटना मध्य रात्री घडली असल्याची शक्यता आहे. (fox)
भद्रावती येथील वन्यजीव प्रेमी इमरान खान हे कामानिमित्य भद्रावती वरून चंद्रपूर ला येत असतांना त्यांच्या निदर्शनास आले कि एक वन्यजीव रस्त्यावर मृतावस्थेत पडून असल्याचे, इमरान खान घाईत असल्याने त्यांनी ही माहिती habitat conservation सोसायटी संस्थेचे चे दिनेश खाटे यांना फोन वरून माहिती दिली. (fox)
दिनेश खाटे व प्रसाद चट्टे यांनी घटना स्थळ गाठून पाहणी केली असता कोल्हा असल्याचे निष्पन्न झाले.अपघातात त्या कोल्ह्याचा पाय तुटून वेगळा झाला होता आणि शेपटी सुद्धा शरीपासून वेगळी होऊन पडून होती, अपघाताची भीषणता ह्याच्यावरून कडून येते कि त्या अज्ञात वाहनाने किती जोराची टक्कर त्या कोल्ह्याला मारली असेल.
नागपूर -चंद्रपूर महामार्गावर वरोरा -भद्रावती चे जंगल क्षेत्र सुद्धा आहे पण राष्ट्रीय महामार्ग किंवा वनविभागाकडून वनीजिवंसाठी कुठलीही उपाय योजना न करता हा महामार्ग होऊ दिला आज त्याचे परिणाम हे वन्यजीव भोगत आहे,ह्या महामार्गावर बिबट, निलगाई, हरीण, तडस्या, कोल्हे, साप असे असंख्य वन्यजीवांना जीव गमवावा लागला आहे.
Chandrapur Maharashtra India tourist