Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल १८, २०२३

अन्यथा खाऱ्या पाण्याने आंघोळीचा इशारा; उपमुख्यमंत्र्यांच्या घराकडे निघालाय मोर्चा

पाणीपुरवठा योजनेसाठी शिवसेनेचा अकोला ते नागपूर पायी मोर्चा

उपमुख्यमंत्र्यांनी चव घ्यावी अन्यथा खाऱ्या पाण्याने आंघोळीचा इशारा

कारंजा येथे शिवसैनिकांनी केले स्वागत
शिवसैनिक संघर्ष यात्रेत सहभागी




कारंजा घाडगे
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळापुर मतदार संघातील 69 गावांना होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिल्यामुळे शिवसेनेचे ठाकरे गट जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख दिनांक 10 एप्रिल पासून सकाळी अकोला ते नागपूर पायदळ संघर्ष यात्रेला सुरुवात करण्यात आली शहराचे आराध्य दैवत श्री राजेश्वर मंदिरातून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला
बाळापूर विधानसभा संघातील खार पानपट्ट्यात गोड पाण्याचे स्त्रोत नसल्यामुळे मागील अनेक वर्षापासून नागरिकांना नाईलाजाने खारेपाणी प्यावे लागत आहे क्षारयुक्त खाऱ्या पाण्यामुळे 69 गावांमधील नागरिकांना किडनीचे विकार जळले आहेत तर अनेकांचा मृत्यू झाला आहे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेल्हारा तालुक्यातील वाघ धरणातून 69 खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी 220 कोटी रुपये मंजूर केले होते मात्र शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे मुख्यमंत्री पदाचा उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर शिंदे सरकार अस्तित्वात आले मात्र या सरकारने मुख्यमंत्री ठाकरेंनी मंजूर केलेल्या कामावर स्थगिती दिली या स्थगितीवर आमदार नितीन देशमुख यांनी अनेक वेळा आवाज उठवला मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष दिले नाही असा आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला पालकमंत्र्यांनी अधिवेशन संपण्याआधी पाणीपुरवठा योजनेची स्थगिती उठविणार असल्याचे आश्वासन दिले परंतु अधिवेशन संपल्यानंतर ही स्थगितीने हटवल्यामुळे अखेर आमदार देशमुख यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले 69 गावांमधील नागरिक व शिवसेनिकासह अकोला ते नागपूर पायदळ मोर्चाला सुरुवात केली दिनांक 17 4 2023 ला या मोर्चाचे स्वागत वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथे शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात केले.
(nitin deshamukh cm Devendra fadanvis)


त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख गोपाल दातकर उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे मंगेश काळे योगेश वानखडे उमेश जाधव बबलू देशमुख अतुल पवनीकर संजय शेळके तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर मैसने रवी मुर्तुडकर गजानन मातंगकर अप्पू तिडके ज्ञानेश्वर गावंडे नितीन लाथंडे ब्रम्हा पांडे अजय गावंडे शहर प्रमुख राजेंद्र मिश्रा शहर प्रमुख राहुल कराळे विनायक गुल्हाने तरुण बैगडे मोठ्या संख्येने नागरिक व शिवसैनिक या मोर्चा सहभागी


*देशमुख यांनी केले होते उपोषण*
या पाणीपुरवठा योजनेचे 60% काम पूर्ण झाले असताना उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिली ही स्थगिती उठवण्यासाठी आमदार नितीन देशमुख यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान भवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसीय आमरण उपोषण छेडले होते ही माहिती कारंजा ओरिएंटल प्लाझा येथे विश्रांती घेण्यासाठी थांबले असता पत्रकारांना माहिती दिली.



या टँकर मध्ये अकोला जिल्ह्यातील खारपाणीपट्ट्यातील पाणी भरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या निवासस्थानी जाऊन या पाण्याची भेट त्यांना देणार आहे असे आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.