Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल १२, २०२३

नगरपंचायत नगराध्यक्षा व गटनेता विपक्षाला नागरी समितीने दिले कठोर स्मरणपत्र*.karanja plitecal news

नगरपंचायत नगराध्यक्षा व गटनेता विपक्षाला नागरी समितीने दिले कठोर स्मरणपत्र*.




____________________________
शीर्षक :-१) *नगरपंचायत नगराध्यक्षा व गटनेता विपक्षाला नागरी समितीने दिले कठोर स्मरणपत्र*.
( *मुख्यमंत्र्यांकडून पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळवा, नाही तर संघर्ष पेटणार* ! )
(नागरी समस्या संघर्ष समितीने दिले संकेत.)
( एk वर्षापूर्वी झाले होते लाक्षणिक उपोषण )

कारंजा (घा. ) स्थानिक नगरपंचायत नगराध्यक्षा व गटनेता विपक्ष यांना कारंजा शहरातील गंभीर अशा पाणी समस्या संदर्भात कठोर स्मरण पत्र देऊन मुख्यमंत्र्यांकडून ताबडतोब पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळवा अशी मागणी केली. एक वर्षापूर्वी पाणी समस्या संदर्भात नागरी समस्या संघर्ष समितीच्या नेतृत्वात नागरिकांनी केलेल्या लाक्षणिक उपोषणाची आठवण करून दिली. नगरपंचायत मधील पक्ष - विपक्षांनी संयुक्त प्रयत्न करून प्रस्तावित वाढीव पाणीपुरवठा योजना ताबडतोब मंजूर करून आणावी असे आवाहन केले .
कारंजा शहरात पाणी समस्या गंभीर आहे. दिवसेंदिवस पाणी समस्येने उग्र स्वरूप धारण केलेले आहे. समस्या कायमस्वरूपी सुटावी म्हणून नगरपंचायत प्रशासनाने वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे. त्या प्रस्तावाचा प्रवास २०१९ पासून सुरू आहे.९ डिसेंबर २०२२ रोजी ३३.८६ कोटीच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी मिळून प्रशासकीय मंजुरी करीता सदर प्रस्ताव मंत्रालयात प्रलंबित आहे. याच प्रश्ना संदर्भात मागील वर्षी 11 एप्रिल 2022 रोजी नागरी समस्या संघर्ष समितिच्या नेतृत्वात नागरिकांनी शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरता एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. वर्ष लोटले परंतु लोकप्रतिनिधी मात्र अजून पर्यंत योजनेला मंजुरी मिळवू शकले नाही. याविषयी नागरी समितीने कठोर शब्दात खंत व्यक्त केली आहे.
डिसेंबर 2021 मध्ये झालेल्या नगरपंचायत च्या निवडणुकीमध्ये, विद्यमान सत्ताधारी व विपक्ष अशा दोन्ही पक्षांनी आपल्या निवडणूक प्रचार भोंग्यामध्ये जनतेला एक दिवसा आढ नियमित शुद्ध पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी म्हणून आपण ते आश्वासन पूर्ण करू शकले नाहीत त्या बाबतीत लोकप्रतिनिधी कडे इच्छाशक्तीचा  अभाव दिसून येत असल्याचे   नागरी समितीने  म्हटले आहे.
          नागरी समिती यासंदर्भात विविध स्तरावर वेळोवेळी संघर्ष करीत आहे. निवेदने, स्मरणपत्रे ,उपोषण, पदयात्रा, सत्याग्रह ,स्वाक्षरी अभियान, ऑनलाईन सर्वे इत्यादी आयुधांचा वापर करून पाणी समस्येकडे  लक्ष वेधले आहे. व नागरी समितीने प्रत्यक्ष मुंबई येथे मंत्रालयात जाऊन  नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांची भेट घेऊन पाणीपुरवठा योजनेच्या प्रलंबित प्रस्तावाचा आढावा सुद्धा  घेतला आहे. 
     शहरातील  पाणी समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन कारंजातील जनतेचे  प्रतिनिधित्व  करणाऱ्या  सर्व  लोकप्रतिनिधींनी आपल्या गावातील नागरिकांची गंभीर अशी पाणी समस्या  सोडवण्याकरीता सर्व लोकप्रतिनिधींनी  संयुक्तपणे आपली सर्व शक्ती वापरावी आणि प्रलंबित वाढीव पाणी पुरवठा योजना शासनाकडून मंजूर करून आणावी असे  आवाहन  स्मरण पत्राद्वारे  कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने  नगराध्यक्षा व
 गटनेता विपक्ष नगरपंचायत यांना केले आहे. नागरी समस्या संघर्ष समिती द्वारा  दिलेले   स्मरणपत्र नगराध्यक्षा स्वातीताई  भिलकर, गटनेता विपक्ष शिरीषजी भांगे, उपाध्यक्ष भगवानजी बुवाडे यांनी स्वीकारले. या प्रसंगी  नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी श्री. शहा उपस्थित होते. स्मरणपत्र देते वेळी व चर्चा करतेवेळी कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीचे बहुसंख्य महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.