Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल ०६, २०२३

IMD Rain Alert Weather Forecas ऑरेंज अलर्ट जारी । सावध राहा; वादळ वारा व गारा पडण्याची शक्यता |

ऑरेंज अलर्ट जारी । सावध राहा; वादळ वारा व गारा पडण्याची शक्यता


https://www.khabarbat.in/2023/04/imd-rain-alert-weather-forecas.html

चंद्रपूर, दि. 6: भारतीय हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात 6 ते 8 एप्रिल 2023 या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व जिल्ह्यात एक, दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, वादळ वारा (वेग 40-50 किमी प्रति तास) आणि गारा पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून 6 व 8 एप्रिल 2023 या दिवसाकरीता येलो अलर्ट व 7 एप्रिल या कालावधीत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.  IMD Rain Alert

 
याअनुषंगाने, नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घ्यावी. पाऊस व गारपिटीचा अंदाज लक्षात घेता रब्बी हंगामातील परिपक्व अवस्थेतील हरभरा, गहू, मोहरी, जवस आदी पिकांची आवश्यक काळजी घ्यावी. वीजगर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. शेतात कामाला जात असताना अशा कालावधीत मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व वीजगर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये. शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. जनावरांना मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे तसेच गोठ्यामध्येच चारा व पाण्याची उपलब्धता करून द्यावी.  IMD Rain Alert Weather Forecas


जिल्ह्यातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे. शेतातील पिकांची, जनावरांची आवश्यक काळजी घ्यावी व स्वसंरक्षणासाठी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण प्राधिकरणाचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.