Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च २०, २०२३

चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती २०२१ पोलीस शिपाई सुधारित तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी जाहीर | Chandrapur District Police Constable Recruitment Provisional Selection List Released

चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२१ तात्पुरती निवड यादी..





चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२१
-: उमेदवारांकरीता महत्वाची सुचना :-

पोलीस शिपाई तात्पुरती निवड यादी दिनांक २० एप्रिल २०२३

चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२१ प्रकियाअंतर्गत दिनांक १८/०४/२०२३ रोजी पोलीस शिपाई तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली होती, त्याअनुषंगाने उमेदवारांचे काही आक्षेप असल्यास दिनांक १९/०४/२०२३ चे २०:०० वाजेपर्यंत पोलीस उपअधिक्षक (गृह) चंद्रपूर यांचे कडे प्रत्यक्ष नोंदविण्यास सुचीत करण्यात आले होते. त्याअन्वये, इतर मागासवर्ग (OBC) प्रवर्गातील चेस्ट क्रमांक १३१०१ या महिला उमेदवाराने प्रत्यक्ष येवुन आक्षेप अर्ज सादर केला आहे. सदरच्या प्राप्त आक्षेप अर्जातील नमुद बाबींची खात्री करण्यात येवुन त्याअंती चेस्ट क्रमांक १३१०१ या महिला उमेदवाराचे नांव इतर मागासवर्ग (OBC) प्रवर्गातील तात्पुरती निवड यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच सदर प्रवर्गातील तात्पुरती निवड यादीतील चेस्ट क्रमांक १३११२ या महिला उमेदवाराचे नांव तात्पुरती निवड

यादीतुन कमी करण्यात येवुन सदर प्रवर्गाचे प्रतिक्षा यादीत अनुक्रमांक १ वर नियमानुसार समाविष्ट करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती (police bharti) 2021 प्रक्रियेमध्ये मैदानी चाचणी आणि लेखी चाचणीमध्ये प्राप्त गुणानुसार तात्पुरती निवड यादी उमेदवारांच्या त्यांच्या जातीने उपलब्ध असलेल्या जागानुसार व जागा वाटपाच्या आरक्षण निकषानुसार अत्यंत पारदर्शकपणे तयार करण्यात येऊन जाहीर करण्यात आली आहे. सदरची तात्पुरती निवड यादी मध्ये उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांनी 19 एप्रिल 2023 पर्यंत पोलीस उपाधीक्षक (गृह) यांच्याशी प्रत्यक्ष भेटावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केले आहे.




चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२१ तात्पुरती निवड यादी..

चंद्रपूर जिल्हा चालक पोलीस शिपाई २०२१ तात्पुरती निवड यादी.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.