Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च २०, २०२३

शेतमालाला भाव मिळावा, या मागणीसाठी आक्रोश मोर्चा; मोर्चातील गर्दी बघा!



जय दादा मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित मोर्चामध्ये
शेतकरी मोठ्या संख्येने सहभाग
उमेश तिवारी/कारंजा घाडगे:
कारंजा(घा) - एकीकडे शासकीय कर्मचारी गेल्या सात दिवसापासून जुन्या पेंशन च्या मागणीसाठी बेमुदत कामबंद आंदोलनात उतरले असतांना मात्र दुसरीकडे शेतकरी सुद्धा आता आंदोलनात उतरले आहेत.

कारंजा येथे हजारो शेतकऱ्यांनी आज दि,20 सोमवार ला आपल्या बैलबंडी च्या सहाय्याने तहसील वर मोर्चा काढून आपल्या मागण्या लावून धरल्या, सामाजिक कार्यकर्ते जयकुमार बेलखडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला, कारंजा येथिल जयस्तंभ चौकात सकाळपासून हजारो शेतकऱ्यांनी जमायला सुरुवात केली होती,ओस पडलेला हा जुना बाजार चौक आज मात्र शेतकऱ्यांनी गजबजून गेला होता, यावेळी अनेकांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व त्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांनी आपल्या बैलगाड्या रस्त्यावर आणायला सुरुवात केली.हजारो शेतकऱ्यांनी आपल्या बैलगाड्या एकामागोमाग आणत थेट तहसील कार्यालयावर आपला मोर्चा वळवला.


यानंतर सर्व शेतकऱ्यांनी मालाला भाव द्यावा, शेतकऱ्यांना 24 तास वीजपुरवठा द्यावा अश्या अनेक मागण्यांच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. जयकुमार बेलखडे व हजारो कार्यकर्त्यांनी आपला शेतकऱ्यांचा मार्च हा तहसीलच्या दिशेने वळविला ,त्यानंतर रस्त्याने जात असताना प्रत्येक जण हा घोषणा देत होता शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे शेतकऱ्यांना 24 तास वीज उपलब्ध करून दिली पाहिजे त्यानंतर शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याचे जे नुकसान झाले आहे त्याची तातडीने पंचनामे होऊन त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्याला दिली पाहिजे या सर्व मागणीसाठी हा मोर्चा आज करण्यात आला होता.

या मोर्चाला जय दादा मित्र परिवाराच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चाचे नामकरण करण्यात आले होते जय कुमार बेलखडे यांनी यावेळी सांगितले की नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे त्याचे अजून पर्यंत पंचनामे झाले नाही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही दुसरे म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्याचा माल हा फार कमी किमतीमध्ये विकावा लागत आहे, शेतकऱ्याला शेतामध्ये काम करण्यासाठी 24 तास वीज उपलब्ध करून दिली पाहिजे रात्री शेतकऱ्याला शेतामध्ये राबवे लागते यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊन घरातला कर्त्या पुरुषाला जर इजा झाली तर कुटुंबाने जगावे कसे असा प्रश्न निर्माण होता, शेतकऱ्यांचा हा मोर्चा तहसील मध्ये येऊन धडकला त्यानंतर तहसील मध्ये तहसीलदार ऐश्वर्या गीरी यांना निवेदन देऊन या मोर्चाची सांगता करण्यात आली.




या मोर्चामध्ये आज विविध ठिकाणाहून शेतकऱ्यांनी हजरी लावली असल्याचे चित्र होते कारण मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते मोर्चामध्ये बैलगाडी मोठया प्रमाणात होत्या, बैलगाडी मध्ये शेतकरी सवार होऊन आपल्या होणाऱ्या अन्यायाच्या घोषणा देत होत्या व सरकारला न्याय देण्याचा मागणी करत होते या मोर्चाच्या बंदोबसासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता सुद्धा घेतली होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.