Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल १७, २०२३

नांदाफाटा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 132 वी जयंती निम्मित दोन दिवसीय कार्यक्रम | anniversary of Dr. Babasaheb Ambedkar

https://www.khabarbat.in/2023/04/132-anniversary-of-dr-babasaheb-ambedkar.html

कोरपना |  तालुक्यातील नांदाफाटा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) जयंतीचे औचित्य साधून १४ आणि १५ एप्रिल 2023 रोजी व्याख्यानमाला व आंबेडकरी जलसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भवनात वाचनालयाची अत्यंत गरज असल्याने खास वाचनालयाचा मदती करता कार्यक्रमच आयोजन करण्यात आले होते. 

*बहुजन समाजा समोरील आवाहने व उपाय* या विषयावर मा.श्रावण देवरे साहेब नाशिक राष्ट्रीय ओबीसी परिषद समनयवक,दिनेश पारखी मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष राजुरा, प्रा.हेमचंद्रजी दुधगवडी सर गडचांदुर,शंतनु कांबळे जिवती,दीक्षा वागमारे अंतरगाव यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला गावतील मेघा पेंदोर सरपंच नांदा, पूरुशोतमजी अस्वले उपसरपंच नांदा,रत्नाकरजी चटप सदस्य,प्ररकश बोरकरजी सदस्य,पूरुशोतमजी निब्राड सर नांदा,सचिन बोडाले सर नांदा,निलेश भाऊ ताजने सामाजिक कार्यकर्ता यांची उपस्थिती होती. शांती कॉलनी ते बुद्ध विहार पर्यंत अशी जल्लोषात धम्म रॅली कडण्यात आली. व दुसऱ्या दिवशी 15 अप्रीला भंते आनंद यांचा धम्मा देस्ना पर पडले व भारतीय संविधान बहुजन मुक्तीचा जाहीरनामा या विषय वर मा.डॉ प्रेमकुमार खोब्रागडे सर सिंधेवाही, मा.कविता गेडाम राजुरा यांनी मार्गदर्शन केले.या नंतर सांस्कृतिक कार्यक्रम मधे शांती कॉलनीतील महिलांनी भाग घेतला होता त्या मधे विवध कार्यक्रम आयोजित केले होते व महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक भूषण कातकर वणी,जयाताई बोरकर चिमूर व जीवन टिपले हिरापुर यांचा आंबेडकरी जलसा चे आयोजन केलं होत.या कार्यक्रमाचं संचालन प्रणय निमस्टकर व आभार कनिष्क ताकसांडे यांनी म्हणाले.या कार्यक्रमाला यशसिव करण्यासाठी समितीचे अध्यक्ष कनिष्क ताकसांडे, समितीचे सिध्दार्थ करमरकर, कैलास ताकसांडे, सचिन जुलमे, रूपेश अलोने,मंगेश पाझारे व बुजाळेजी यांनी परिश्रम घेतले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.