Gas Leak। गॅस गळतीने 11 जणांचा मृत्यू, तर 11 जण बेशुद्ध Ludhiana Gas Leak Live Updates: 11 killed
पंजाबमधील लुधियानामध्ये वायू गळती झाल्यानं आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. (Ludhiana Gas Leak Live Updates: 11 killed) प्रशासनानं घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी धाव घेतली असून लोकांना त्या ठिकाणाहून सुरक्षित स्थळी पाठवण्यात आलं आहे. ११ जणांचा मृत्यू झाला असून ११ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. वायू गळतीची घटना सकाळी सव्वा सातच्या सुमारास लक्षात आली. वायू गळतीमुळं अनेक जण चक्कर येऊन पडले. ते पाहताच त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या लोकांना देखील त्रास झाला आहे.
या घटनेनंतर पोलीस, प्रशासन आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी हजर आहे. तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, लुधियानाच्या ग्यासपुरा भागात गॅस गळतीची घटना अत्यंत वेदनादायक आहे. शक्य ती सर्व मदत केली जात आहे. याबाबतची संपूर्ण माहिती लवकरच देण्यात येईल. तसेच सर्व मदत करण्यात येईल, असं मुख्यमंत्री मान म्हणालेत. (Ludhiana gas leak accident very sad; NDRF team engaged in relief work on the spot: Home minister Amit Shah)
या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लुधियानाच्या ग्यासपुरा येथील सुआ रोडवरील गोयल कोल्ड ड्रिंक्स इमारतीतून गॅस गळती झाल्याचे सांगण्यात येत आहे. या इमारतीच्या वरच्या भागात लोक राहत होते. लोक बेशुद्ध झाल्याचीही शक्यता आहे.