*ना सुधीर यांनी केले स्वागत*
*चंद्रपूर, दि. २९ :* काष्ठपूजनाच्या निमित्ताने चंद्रपूर नगरीत आलेल्या उत्तर प्रदेशातील तीन मंत्र्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री व चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी या तीनही मंत्र्यांचे हृद्यपूर्वक स्वागत केले.
देशातील सर्वोत्तम सागवान चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. हे सागवान काष्ठ शोभायात्रेने अयोध्येला पाठविण्यात येणार आहे. यानिमित्ताने चंद्रपुरात बुधवार, २९ मार्च रोजी काष्ठपूजनाचा सोहळा आयोजित करण्यात आला.Chandrapur Kashta Puja
Chandrapur Kashta Puja
या सोहळ्याच्या निमित्ताने उत्तर प्रदेशचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. योगेंद्र उपाध्याय, स्टॅम्प, न्यायालय शुल्क राज्यमंत्री श्री. रवींद्र जयस्वाल आणि वन व पर्यावण मंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. अरुणकुमार सक्सेना चंद्रपुरात दाखल झाले. या सर्व मंत्र्यांचे चंद्रपुरात उत्साहात स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री व चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी स्वत: तीनही मंत्र्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. चंद्रपुरातील या पारंपारिक पद्धतीच्या स्वागताने उत्तर प्रदेशातील तीनही मंत्री भारावून गेले.