श्री. मनोहर सखाराम बेले रा. चंद्रपूर दिनांक 12 मार्च 1965 रोजी यांचा जन्म झाला त्यांना तीन भाऊ तीन बहिणी असा त्यांच्या मोठा परिवार आहे. परिस्थिती हालाकिची होती तरीसुद्धा मनोहर बेले यांनी आपला शिक्षण पूर्ण करून जीवनाच्या उदरनिर्वाह करण्यासाठी माहिती जनसंपर्क कार्यालय नागपूर च्या विभागात जिल्हा माहिती कार्यालय चंद्रपूर येथे दिनांक 23 जुलै 1984 रोजी ते नोकरीत रुजू झाले. त्यांच्या स्वभावामुळे कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मोहून गेले होते सांगितलेल्या कोणत्याही काम मोठ्या जबाबदारीने वेळीच पूर्ण करीत होते. नोकरी करीत असताना जीवनातील लहान मोठ्या गोष्टीचा सामना करावा लागत होता पण ते न डगमगता आपले कार्यपुढे चालू ठेवले. आपल्या परिवारासाठी एक मोठा आधार आहे. त्यांना एक मुलगी, एक मुलगा त्यांचा मुलगा चांगले शिक्षण घेत आहेत.
शासनाने त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे त्यांना दिनांक 6 नोव्हेंबर 2016 रोजी बढती मिळाली. व ते लिपिक या पदाची जबाबदारी स्वीकारून दिनांक 8 नोव्हेंबर 2016 रोजी जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली, येथे रुजू झाले. गडचिरोली मध्ये आल्यानंतर त्यांना या डिजिटल युगाचा मोठा सामना करावा लागला व त्यांना कॅम्पुटर पासून काही गोष्टी स्वतः हाताळाव्या लागल्या पण बेले हे उत्तम उत्साही होते त्यांनी काही काळातच या सर्व गोष्टी शिकून चांगल्या प्रकारे जबाबदारी स्वीकारली गडचिरोलीत असताना आम्ही त्यांच्या स्वभाव एकदम जवळून बगितला. आमचे कोणत्याही कार्यालय काम असो,किंवा घरगुती प्रसंग असो,त्यांनी वेळोवेळी साथ दिली. व आज दिनांक 31 मार्च 2023 रोजी शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त होत आहेत. तरी त्यांनी केलेले ३८ वर्ष ८ महीने शासनाची नोकरी उत्तम कामगिरीची पावती आहे. त्यांनी परिस्थितीवर मात करून अस्तित्व निर्माण केले आहे. असे म्हणाला काही हरकत नाही. यात त्यांचा पत्नीचा मोठा वाटा आहे. त्यांचे पुढील आयुष्य सुखी व समाधानी जावो. हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
लेखक:-
वामन खंडाईत
गडचिरोली : जिल्हा माहीती कार्यालय गडचिरोलीचे लिपीक मनोहर बेले यांचा जिल्हा माहीती कार्यालय गडचिरोली येथे जिल्हा माहीती अधिकारी सचिन अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष कांतीभाई सुचक, आशाताईं मनोहर बेले, मुकुंद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी सचिन अडसूळ म्हणाले की श्री बेले हे शातं स्वभावी व पुर्णवेळ आनंदी राहून काम करणारे कर्मचारी होते. त्यांनी कार्यालयातील कामावरील निष्ठा न सोडता सेवा दिली. गडचिरोली सारख्या जिल्हयात व चंद्रपूर येथे मिळून 38 वर्ष सेवा दिली. त्यांचे पूढील जीवन सुख समाधानाचे जावोत अश्या प्रकारच्या शुभीच्छा त्यांनी दिल्या. याप्रंसगी मनोहर बेले हे सत्काराला उत्तर देताना भारावून गेले. कांतीभाई सुचक यांनीसुद्धा शुभेच्छा दिल्या . कार्यकमाचे संचलन प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी तर आभार महादेव बसेन यांनी मानले. कार्यक्रमास गोवर्धन गोटाफोडे. नरेंद्र माहेश्वरी , प्रभाकर कोटरंगे , टावर मडावी , अनुप मेश्राम , दिनेश वरखडे , विजय लडके , के . एन. मारोटे, रेखाताई वंजारी, विजया इंगोले , गुरुदास गेडाम, तन्मय देशपांडे. आदी सहीत कार्यालयीन कर्मचारी , संपादक , पत्रकार बहुसंखेनी उपस्थित होते.