मुंबई : प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झालं. ते 67 वर्षाचे होते. अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली.
BREAKING | Actor #SatishKaushik passes away.
जानता हूँ “मृत्यु ही इस दुनिया का अंतिम सच है!” पर ये बात मैं जीते जी कभी अपने जिगरी दोस्त #SatishKaushik के बारे में लिखूँगा, ये मैंने सपने में भी नहीं सोचा था।45 साल की दोस्ती पर ऐसे अचानक पूर्णविराम !! Life will NEVER be the same without you SATISH ! ओम् शांति! 💔💔💔
असे त्यांनी पहाटे सव्वा पाच वाजताच्या दरम्यान ट्विट केले आहे.
गंभीर भूमिका करणारा अभिनेता ते हास्य अभिनेता अशी सतीश कौशिक यांची ओळख होती. शिवाय ते दिग्दर्शकही होते आणि अनेक सिनेमांचे निर्मातेही होते. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
सतीश कौशिक हे हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेते आहेत. तो मुख्यतः मिस्टर इंडिया चित्रपटातील त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो, ज्यामध्ये त्याने कॅलेंडरची भूमिका केली होती.
सतीश कौशिक यांनी करोलबाग, दिल्ली येथून सुरुवातीचे शिक्षण घेतले. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या कोरेमल कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला.
BREAKING | Actor #SatishKaushik passes away.