आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन Union Finance Minister Smt. Nirmala Sitharaman यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प आहे, अशा शब्दात ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे.
Union Finance Minister Smt. Nirmala Sitharaman |
विकास, वंचित घटनांना प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमता विस्तार, हरित विकास, युवक, आर्थिक क्षेत्राचा विकास अशा सात प्रमुख मुद्द्यांवर केंद्रित 'सप्तर्षी योजना' म्हणून ओळखला जाईल असा हा अर्थसंकल्प आहे. अशा शब्दात ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे.
अर्थसंकल्प देशाला स्वयंपूर्ण व समृध्दतेच्या दिशेने नेणारा असून या अर्थसंकल्पातून शेतकरी, बेरोजगार, कामगार, उद्योजक, ज्येष्ठ नागरिक, करदाते, महिला सशक्तीकरण व संपुर्ण घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला आहे, असे हंसराज अहिर म्हणाले.
देशातील जनतेचे जीवन बेहाल करणारे बजेट असून, मला पहा आणि फुले वहा असा प्रकार आहे. महागाई, बेरोजगारी, मजूर वर्ग, वाढती गरिबी याकडे लक्ष द्यायला पाहिजे होते. गरीबी व बेरोजगारी मुळे महागाईचे चटके गरिबांना जाणवत आहेत. अशी प्रतिक्रिया खासदार बाळु धानोरकर यांनी व्यक्त केली.
जागतिक बाजारात आर्थिक मंदीचे सावट आहे. दुसरीकडे अदाणीमुळे देशाची अर्थव्यवस्था गतीने घसरतेय. हे डोळ्यासमोर न ठेवता होवू घातलेल्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेला अर्थसंकल्प फसवा आहे अशी प्रतिकिया आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केली आहे.
उद्योजकांपुढे पायघड्या घालणारा व उपेक्षित वर्गाच्या योजनांना कात्री लावणारा भाजप सरकारचा अर्थसंकल्प. ओबीसी समाज या देशाचा मुख्य कणा आहे, त्यांच्यासाठी कोणतीही मोठी तरतूद भाजप सरकारने अर्थसंकल्पात केली नाही, असे आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले.
Union Finance Minister Smt. Nirmala Sitharaman