डिसेंबरपर्यंत पात्र शिधापत्रिकाधारकांना शिधावस्तु
नागपूर दि. 3 : swast dhanya dukan राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत नागपूर शहर पुरवठा विभागाच्या कार्यक्षेत्रातील पात्र सर्व कौटुंबिक शिधापत्रिकाधारकांना 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत अनुज्ञेय असलेले अन्नधान्य मोफत वितरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून माहे फेब्रुवारी 2023 करीता शिधावस्तु वाटप परिमाण या प्रमाणे आहे. rashan dukan
गरजूंवर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये यासाठी शासनाकडून तीन रुपये किलो दराने तांदूळ आणि दोन रुपये किलो दराने गहू दिला जातो. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने या योजनेत बदल करत आता लाभार्थ्यांना पूर्णपणे मोफत धान्य पुरविण्याचा निर्णय घेतला.
प्राधान्य गट- प्रती व्यक्ती 2 किलो गहु व 3 किलो तांदुळ मोफत वितरित करण्यात येईल.
अंत्योदय गट – प्रती शिधापत्रिका 10 किलो गहू व 25 किलो तांदुळ मोफत दिल्या जाईल. तसेच प्रती शिधापत्रिका 20 रुपये प्रमाणे एक किलो साखर वितरित करण्यात येईल, असे अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी कळविले आहे. rashan dukan
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना २ रुपये किलो दराने गहू आणि ३ रुपये किलो दराने तांदूळ दिला जातो. मात्र, करोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गरजूंची उपासमार होऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत धान्याची योजना जाहीर केली. राज्य सरकारने एक महिना आणि केंद्र सरकारने दोन महिने असे तीन महिने मोफत धान्य देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, वेळोवेळी या योजनेची मुदत वाढविण्यात आली. डिसेंबर २०२२पर्यंत मोफत धान्य आणि स्वस्त धान्याचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी घेतला. अंत्योदय गटातील नागरिकांना एका शिधापत्रिकेवर ३५ किलो धान्य दिले जाते, आणि प्राधान्य गटातील नागरिकांना प्रतिव्यक्ती ५ किलो याप्रमाणे धान्य वितरित केले जाते. १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीसाठी हा निर्णय लागू राहणार असल्याचे पुरवठा शाखेकडून सांगण्यात आले. rashan dukan