Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी ०५, २०२३

जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयात नॅशनल अप्रेंटिशिप अवेअरनेस वर्कशाप चे आयोजन Organized National Apprenticeship Awareness Workshop at District Vocational Education and Training Office




चंद्रपूर (प्रतिनिधी)-
 व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे वतीने चंद्रपूर सिव्हिल लाईन स्थित जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयात (शास.आयटीआय जवळ) येत्या ९ फेब्रुवारी ला सकाळी १० ते सायंकाळी ५ या दरम्यान एक दिवशीय नेशनल अप्रेंटिशीप अवेअरनेस वर्कशाप चे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यशाळेत चंद्रपूर ,गडचिरोली आणि गोंदिया या तीनही जिल्ह्यातील उद्योजक व माजी प्रशिक्षणार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. करिता या अवेअरनेस वर्कशॉप चा लाभ संबंधितांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री. रविंद्र मेहेंदळे यांनी एका पत्रान्वये केलेले आहे . या वर्कशॉप मध्ये‌ बोट , आरडीइएस ,एमएसएमई विभागाचे वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी अप्रेंटीस नोंदणी व नियमावली संदर्भात महत्त्वाचे मार्गदर्शन करणार आहे.


Organized National Apprenticeship Awareness Workshop at District Vocational Education and Training Office

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.