Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी १७, २०२३

समृद्धी महामार्गावर भरधाव कारचा टायर फुटल्याने नागपुरातील दोघे ठार Nagpur Samriddhi Highway

khabarbat  khabarbat


समृद्धी महामार्गावर भरधाव कारचा टायर फुटल्याने नागपुरातील दोघे ठार 

वैद्यकीय कारणासाठी नागपूरहून नाशिककडे ( Nagpur  Samriddhi Highway) जात असताना राजेश रहाटे आणि अलका वझुलकर यांचा अपघातात मृत्यू झाला. नागपूरमधील राजेश राजाराम रहाटे हे आपली मुलगी लीना राजेश रहाटे, भाची अवंतिका वझुलकर आणि मेव्हणी अलका वझुलकर यांच्यासोबत शुक्रवारी दुपारी नाशिकच्या दिशेने जात होते.  भरधाव कारचा टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी समृद्धी महामार्गावर घडली. कारचा टायर फुटून कार दुभाजकावर आदळली. कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात ही घटना घडली. दोन जखमी तरुणींवर जखमींवर कोपरगावच्या एसजेएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एअरबॅग उघडूनही दोघांनी जीव गमावला.  अपघात एवढा भीषण होता की, यात कारचा चक्काचूर झाला.  

 Nagpur Samriddhi Highway Accident Crime Road Police 


Speaker microphone 
 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.