नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ
मविआच्या सुधाकर अडबोले यांना निर्णायक आघाडी
Maharashtra MLC Election Results 2023: MVA' Sudhakar Adbale Leading in Nagpur
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक
पहिल्या पसंतीच्या 28 हजार मतपत्रिकांची मोजणी पूर्ण
दुसऱ्या फेरीतील 6 हजार 360 मतपत्रिकांची मोजणी सुरू
नागपूर, दि. 2 : विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज सकाळी 8 वाजता पासून मतमोजणीस सुरूवात झाली असून दुपारी 3.25 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी यांनी पहिल्या पसंतीच्या 28 हजार मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाल्याची घोषणा करत उमेदवारांना प्राप्त मतांची माहिती दिली.
डॉ. विजयलक्ष्मी बिदरी यांनी सांगितले, आज सकाळी 8 वाजता पासून एकूण 28 टेबलवर प्रत्येकी 1 हजार मतपत्रिका या प्रमाणे मतमोजणीस सुरुवात झाली. एकूण ३४ हजार ३६० मत पत्रिकांपैकी २८ टेबलवरील २८००० मत मोजणीत पहिल्या पसंतीची मते मोजण्यात आली. यापैकी 26 हजार 901 मत वैध ठरली तर 1 हजार 99 मत अवैध ठरल्याचे डॉ. विजयलक्ष्मी बिदरी म्हणाल्या. वैध ठरलेल्या मतांपैकी एकूण 22 उमेदवारांना प्राप्त पहिल्या पसंतीचे मते पुढिल प्रमाणे.
१)सतीश जगताप (महाराष्ट्र विकास आघाडी पक्ष ) : ४३९
२)प्रा.दीपकुमार खोब्रागडे (वंचित बहुजन आघाडी पक्ष) :३०३
३) देवेंद्र वानखडे (आम आदमी पक्ष) :६१८
४) राजेंद्र झाडे (समाजवादी पक्ष) (युनायटेड ) : २७४२
५)अजय भोयर (अपक्ष) :१०९०
६) सुधाकर अडबाले (अपक्ष) : १४,०६९
७) सतिश इटकेलवार (अपक्ष) :६०
८) बाबाराव उरकुडे (अपक्ष) : ७९
९)नागो गाणार (अपक्ष) : ६,३६६
१०) रामराव चव्हाण (अपक्ष ): ११
११) रवींद्रदादा डोंगरदेव (अपक्ष) : ३६५
१२) नरेश पिल्ले (विश्व हिंदू जनसत्ता बहुमत पक्ष) : ०८
१३) निमा रंगारी (बहुजन समाज पक्ष) : ५१
१४) नरेंद्र पिपरे (अपक्ष) :३२५
१५) प्रा. प्रवीण गिरडकर (अपक्ष) : ४३
१६) इंजिनिअर प्रो. सुषमा भड (अपक्ष): ५६
१७) राजेंद्र बागडे (अपक्ष) : ४२
१८) डॉ.विनोद राऊत (अपक्ष):४६
१९) उत्तमप्रकाश शहारे (अपक्ष): ६१
२०) श्रीधर साळवे (अपक्ष): ४
२१) प्रा सचिन काळबांडे (अपक्ष): ६४
२२) संजय रंगारी (अपक्ष):५९
दुपारी 3.25 वाजता पासून दुसऱ्या फेरीतील ६,३६० मतपत्रिकांची मोजणी सुरू झाल्याचेही डॉ. बिदरी यांनी सांगितले. निवडणूक निरिक्षक अरुण उन्हाळे, नागपूरचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन इटनकर, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मिना, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गोवडा, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आणि उपायुक्त तथा सहायक निवडणूक अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक उपस्थित होते.
तत्पूर्वी, आज सकाळी अजनी येथील मेडीकल रोडवर स्थित समुदाय भवनात ७.३० वा. मतपेट्या बंद केलेली स्ट्राँगरुम बंदोबस्तात इनकॅमेरा उघडण्यात आली. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ.विजयलक्ष्मी बिदरी यांनी मतमोजणी केंद्रावर उपस्थित मतमोजणी पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक, अधिकारी-कर्मचारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी आदिंना गोपणीयतेची शपथ दिली. 8 वा. पासून मतमोजणीस सुरूवात झाली. मतपेट्यांतील मतपत्रिका मिक्सिंग ड्रममध्ये एकत्र करण्यात आल्या व त्यांनतर प्रत्येक टेबलवर १ हजार मतपत्रिका याप्रमाणे मतमोजणीस सुरुवात झाली. यावेळी उमेदवार व प्रत्येक उमेदवाराचा एक प्रतिनिधी या प्रमाणे उपस्थिती होती.
मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर आयोगाच्या परवानगीने विजयी उमेदवार घोषित होऊन त्यास निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त यांच्याहस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून दुप्पट मताधिक्याने विजयी झालेले महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार श्री.सुधाकर अडबाले यांचे Vijay Wadettiwar yani तोंड गोड करून अभिनंदन केले. महाविकास आघाडीच्या विजयात मोलाचा वाटा देणारे सर्व सहकारी यावेळी उपस्थित होते.
नागपूर शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक मतमोजणीच्या ठिकाणी प्रनिवडणूक निरिक्षक #अरूण_उन्हाळे, निवडणूक अधिकारी तथा विभागीय आयुक्त #विजयलक्ष्मी_बिदरी उपस्थित
NAGPUR- नागपूर शिक्षक मतदार संघ मतमोजणीची महत्वाची अपडेट |
#MLCElectionUpdate #MLCElection #Candidate #GraduateElection #PadvidharMatadarSangh