ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan ) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांच्याकडून करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आहे.
Eknath Shinde Meet Appasaheb Dharmadhikari । महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवरून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतिने हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. 2022 या वर्षाचा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणार आहे
आप्पासाहेब धर्माधिकारी यांना Maharashtra Bhushan Award
अप्पासाहेब धर्माधिकारी, जन्मनाव दत्तात्रेय नारायण, हे महाराष्ट्रातील भारतीय समाजसेवक आहेत. नाना धर्माधिकारींच्या पावलावर पाऊल टाकत, अप्पासाहेब महाराष्ट्रात अनेक वृक्षारोपन, रक्तदान शिबीर, निशुल्क वैद्यकीय शिबीर, रोजगार मेळावे, स्वच्छता मोहिम, अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती केंद्र इत्यादी कार्यक्रमांच्या आयोजनास कारणीभूत ठरले. २०१४ मध्ये डाॅ. डी वाय पाटील विद्यापीठ, नेरुळने त्यांना विद्यालंकार ही मानद पदवी देऊन सन्मानित केले. २०१७ मध्ये, ते चौथा सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान, पद्मश्रीने सन्मानित झाले. Dr. Appasaheb is the eldest son of Dr. Nanasaheb. He was born in the village of Revdanda, Taluka Alibag, District Raigad on 14th May 1946