EPS-95 नवीन वाढीव पेन्शन योजनेच्या जनजागृतीसाठी महानिर्मितीची युद्धस्तरीय मोहीम
१८ ते २० फेब्रुवारी विशेष शिबीर
नागपूर (१७ फेब्रुवारी २०२३) :EPS-95 नवीन वाढीव पेन्शन योजनेची (EPS-95 Pension Scheme under EPFO) माहिती पात्र सेवानिवृत्त आणि विद्यमान जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना कमीत कमी कालावधीत माहिती देऊन विहित नमुन्यात पर्याय २० फेब्रुवारीपर्यंत संबंधित कार्यालयात जमा करण्यासाठी महानिर्मितीने जनजागृतीपर ठोस कृती कार्यक्रम आखला आहे. यात १५ फेब्रुवारी २०२३ रोजी परिपत्रक काढून ते कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे.
सप्टेंबर २०१४ पासून जानेवारी २०२३ पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या तसेच विद्यमान कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुमारे १३००० व्यक्तींना त्यांच्या मोबाईलवर ह्या संदर्भात एस.एम.एस. पाठविण्यात आलेला आहे. महानिर्मितीच्या सेवानिवृत्त, विद्यमान कर्मचारी, संघटना प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांशी निगडित व्हॉट्सअप ग्रुप्स, फेसबुक पेज तसेच सोशल मीडियावर परिपत्रक, पोस्टर, टेक्स्ट सारखी माहिती प्रसिद्ध केली आहे. वीज क्षेत्रातील संघटना पदाधिकारी यांच्या मदतीने सदस्यांना माहिती देण्यात येत आहे. १८ ते २० फेब्रुवारी असे एकूण ३ तीन दिवस विशेष शिबिर म्हणजे शनिवार-रविवारला सुटी असतांना देखील वीज केंद्र स्तरावर नमुना फॉर्म स्वीकारण्यात येणार आहे.
What is EPS 95?
Employees' Pension Scheme or EPS 95 refers to a social security plan launched by EPFO in 1995. The scheme allows organised sector employees to receive a pension after retiring at 58 years.
वीज केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि मुख्यालयाचा उत्तम समन्वय रहावा म्हणून कंट्रोल रूम स्थापित करण्यात आली असून त्यामध्ये मानव संसाधन,औद्योगिक संबंध विभागाचे अधिकारी समन्वय राखणार आहेत. ज्या कार्यालयातून कर्मचारी सेवानिवृत्त झाला असेल त्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन अथवा स्पीड पोस्ट ने नमुना अर्ज पाठवता येईल. महानिर्मितीच्या सेवानिवृत्त आणि विद्यमान कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी ही युद्धस्तरीय मोहीम राबविण्यात येत असल्याचे कार्यकारी संचालक(मानव संसाधन) भीमाशंकर मंता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
Speaker