Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी १९, २०२३

जिल्हा व्यवसाय शि. व प्रशि. कार्यालयात नॅशनल अप्रेंटिशिप अवेअरनेस वर्कशाप Apprenticeship Awareness Workshop

जिल्हा व्यवसाय शि. व प्रशि. कार्यालयात नॅशनल अप्रेंटिशिप अवेअरनेस वर्कशाप Apprenticeship Awareness Workshop

चंद्रपूर (प्रतिनिधी)-
तांत्रिकदृष्ट्या पात्र असणाऱ्या व्यक्तींना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने अप्रेंटिसशिप कायद्याची निर्मिती झालेली असून या अंतर्गत इच्छुक उमेदवारांना संधी मिळाल्यास त्यांच्या कार्यशक्तीला प्रोत्साहन मिळेल, आणि उद्योजकांना प्रशिक्षित मनुष्यबळ सहज उपलब्ध होईल. करिता जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापनांनी या उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचे वातावरण उपलब्ध करून देणे त्यांच्या हिताचे असल्याचे प्रतिपादन आरडीएसडीई चे सहाय्यक संचालक रोहन पाटील यांनी केले.

    जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय आणि मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक मार्गदर्शन केंद्र( बी. टी. आर. आय) यांच्या संयुक्त विद्यमाने  एक दिवसीय नेशनल  अप्रेंटिसशिप अवेअरनेस कार्यशाळेचे  आयोजन करण्यात आलेले होते.  व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यशाळेत चंद्रपूर ,गडचिरोली आणि गोंदिया या तीनही जिल्ह्यातील उद्योजक व खाजगी व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य तथा माजी प्रशिक्षणार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली होती.  या  कार्यशाळेचे उद्घाटन आर. डी. एस. डी. इ. चे सहाय्यक संचालक रोहन पाटील (मुंबई) यांचे हस्ते झाले तर अध्यक्षस्थानी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी  श्री. रविंद्र मेहेंदळे होते.  प्रमुख मार्गदर्शक म्हणून डी. जी.इ. टी. चे प्रशिक्षण अधिकारी श्री.  विजयकुमार, जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे, सेवा निवृत्त जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुशील बुजाडे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रास्ताविक बी. टी. आर. आय. च्या सहाय्यक प्रशिक्षणार्थी  सल्लागार प्रणाली दहाटे यांनी केले.  

याप्रसंगी श्री. भैय्याजी येरमे आणि सुशील बुजाडे  यांनी अप्रेंटिस कायद्याच्या संबंधित महत्त्वाची माहिती देत  जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापनाने उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांसाठी  शिकाऊ  उमेदवारी भरतीसाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. तर श्री.विजयकुमार यांनी  अप्रेंटीस नोंदणी व नियमावली  संदर्भात  मार्गदर्शन केले. प्राचार्य रवींद्र मेहेंदळे यांनीही याप्रसंगी समयोचित विचार व्यक्त करून कार्यशाळेला शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.एन.गेडकर यांनी केले तर आभारप्रदर्शन बी. आर. बोढेकर यांनी केले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी निदेशक श्री.नाडमवार, कोठारकर, कु. हेपट, कु. वाघाडे , महातव, धात्रक आदींनी सहकार्य केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.