कामठी: येथील समाजकार्य महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रुबीना अन्सारी तर प्रमुख उपस्थिती म्हणून रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. राष्ट्रपाल मेश्राम, डॉ. सविता चिवंडे मंचावर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. रुबीना अन्सारी यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” हे महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत वाजविण्यात आले. अध्यक्षीय भाषणातून डॉ. अन्सारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य आणि कर्तृत्वावर विस्तृत प्रकाश टाकला. संचालन डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी केले तर आभार डॉ. सविता चिवंडे यांनी मानले.
कार्यक्रमाला प्रा. उज्वला सुखदेवे, डॉ. प्रणाली पाटील, डॉ. ओमप्रकाश कश्यप, डॉ.मनोज होले, प्रा. शशिकांत डांगे, डॉ. मनीष मुडे, डॉ. हर्षल गजभिये, डॉ.राहुल जुनगरी, प्रा. राम बुटके, प्रा. गिरीश आत्राम, प्रा. आवेशखरणी शेख, शिक्षकेतर कर्मचारी प्रफुल बागडे, उज्ज्वला मेश्राम,गजानन कारमोरे, शशील बोरकर, नीरज वालदे, राहुल पाटील तसेच अजिंक्य उके, राहुल श्यामकुवर हे विद्यार्थीसुद्धा उपस्थित होते.