Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी १६, २०२३

सावली तालुक्यांतील 48 गावांना मिळणार शुद्ध पेयजल 48 villages in Savli talukas will get pure drinking water

आ. वडेट्टीवारांच्या प्रयत्नांचे फलित - जलमिशन योजने अंतर्गत 90 कोटींचा निधी मंजुर



सावली तालुक्यातील ग्रामखेड्यांची शुद्ध पेयजल समस्या कायमस्वरूपी मिटणार आहे. तालुक्यातील 48 गावांना माजी मंत्री तथा आ. विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत अंदाजे 90 कोटींच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी 21 गावांना नळ योजनेचे कामाचे कार्यारंभ आदेश प्राप्त झाले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सलग दोन वर्षे कोरोना या वैश्विक महामारीमुळे संपूर्ण जग हैराण झाले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत राज्याची आपत्ती व्यवस्थापनाची सूत्रे सांभाळणारे मंत्री तथा आ. विजय वडेट्टीवार यांनी जीवाची परवा न करता राज्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. कोरोना संकट टाळण्यासोबतच विकास कामांवर भरही दिला. अशाच विकास कामांपैकी एक असलेल्या ब्रह्मपुरी मतदार संघातील सावली तालुक्यातील एकूण 48 गावांना दूषित पाणी पुरवठ्यामुळे आरोग्य जपने कठीण जात असल्याची समस्या वर्षानुवर्षांपासून भेडसावत होती या गंभीर समस्येच्या निराकारणाकरिता माजी मंत्री वडेट्टीवार यांनी पुढाकार घेऊन त्या 48 गावांना शुद्ध पेयजल मिळावे याकरिता विशेष पाठपुराव्यातून 90 कोटीं निधीची मंजुरी मिळवून दिली.



जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत प्रस्तावित असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेमधे बोरमाळा पाणीपुरवठा योजना अंदाजित किंमत १३८.३९ लक्ष, डोनाळा५७.९६ लक्ष, विहीरगाव ९८.११ लक्ष, आकापूर १००.९८ लक्ष, जनकापुर (तुकूम)३७.४७ लक्ष, सोलर आधारित दुहेरी पाणी पुरवठा योजना मध्ये सिंगापूर, खानबाद (चक) सावंगी(दीक्षित) उमरी, थेरगाव ७७.५२ लक्ष,सायखेडा ८८.४७ लक्ष, गेवरा (खुर्द)९८.६९ लक्ष, डोंगरगाव (मस्के)१२०.१७ लक्ष, मेहा (बुज)११५.२० लक्ष, बेलगाव ९३.२७ लक्ष , जांम (बुज) १४५.१९ लक्ष,कडोली ९२.९२ लक्ष, उसेगाव६५.९६ लक्ष, गायडोंगरी ७८.५६ लक्ष, करोली ११६.४५ लक्ष, कसरगाव ९७.७१ लक्ष, तर प्रादेशिक पाणीपुरवठा योजने अंतर्गत बोथली पाणीपुरवठा योजना अंदाजित किंमत ६४६.९६ लक्ष, साखरी प्रादेशिक योजना अंदाजित किंमत ३५०.७५ लक्ष, व्याहाड (बूज) प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अंदाजित किंमत ५००.५४ लक्ष, व्याहाड (खुर्द) योजना अंदाजित किंमत ४९८.४८ लक्ष, पाथरी प्रादेशिक योजना अंदाजित किंमत १७००.२६ लक्ष यासह इतर एकूण 48 गावांचा समावेश आहे. माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांचा विकासात्मक दृष्टिकोन व नागरिकांप्रति असलेली सद्भावना तसेच दीर्घ अनुभवातून मतदारसंघातील ग्राम खेड्यातील समस्या जाणून घेत शासन स्तरावर मंजूर करून घेतलेल्या सदर नळ योजना कामामुळे हजारो नागरिकांच्या शुद्ध पेजलाची समस्या कायमस्वरूपी मिटणार आहे त्यामुळे सावली तालुक्यातील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.