चंद्रपूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि आदरणीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती एस. एस. भीष्म मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ११/०२/२०२३ रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यातील न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे (Lok Adalat) आयोजन करण्यात आले होते.
सदर लोक अदालतीमध्ये प्रलंबीत न्यायालयीन प्रकरणे एकुण ७३९३ व दाखलपूर्व प्रकरणे १६१६८ ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबीत न्यायालयीन प्रकरणांपैकी ९३४ प्रकरणे तर दाखलपूर्व प्रकरणांपैकी १७९५ निकाली काढण्यात आली. प्रलंबीत प्रकरणांमध्ये मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे एकुण २४ निकाली काढण्यात आली असुन नुकसान भरपाई रक्कम रू.१,४१,५८,०००/- वसुल करण्यात आले. कौटुंबिक वाद म्हणजेच घटस्पोटाची प्रकरणांपैकी ०१ प्रकरणामध्ये पक्षकारांनी एकत्र राहण्याचा समजुतीने निर्णय घेतला. धनादेश प्रकरणांपैकी ११५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. कामगार न्यायालयातील ०३ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
चंद्रपूर जिल्हयातील सर्व न्यायालयात लोक अदालत यशस्वी होण्यासाठी सर्व न्यायाधीश, सर्व वकील, सर्व न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले. अशी माहिती श्री. सुमित वि. जोशी, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर यांनी केले आहे.