Chandrapur Maharashtra India
मामला फाटा नजीक चंद्रपूर-मूल राष्ट्रीय महामार्ग ९३० वर अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी हरणाच्या मृत्यू तर एक दिवसाआधी जुनोना वनपरिक्षेत्रात बल्लारशाह-गोंदिया रेल्वेच्या अपघातात सांबर प्राण्याचा चा मृत्यू झाला, ह्या घटना वनविकास महामंडळ च्या वनपरिक्षेत्रात घडल्या असून राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने लवकरात लवकर पाऊल उचलून वन्यप्राण्यांचे अपघाताचे सत्र हे कसे थांबवता येईल यांच्याकडे लक्ष देणं गरजेचे झाले आहे. चंद्रपूर-मूल राष्ट्रीय महामार्ग ९३० वर वन्यप्राण्यांचे अपघाताचे सत्र सुरूच आहे, अनेक वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागला आहे, मामला फाट्यावरून काही दिवसापूर्वी एका वाघाने रस्ता ओलांडण्याचे विडिओ वायरल झाले होते ,त्याच भागात मादी हरणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दवी मुर्त्यू झाला,अपघात एवढा भीषण होता कि मादी हरणाच्या गर्भातील गर्भ पिशवीमध्ये असलेला पूर्ण वाढ झालेला पिल्लू सुद्धा मृत्युमुखी पडला. Deer 🦌
मामला वनपरिक्षेत्राचे वनविकास महामंडळाचे अधिकारी यांनी आत्राम यांनी अपघाताची भीषणता लक्षात घेता मादी हरणाच्या उपचारासाठी तत्परता दाखविली पण मादी हरणाचा जागीच मृत्यू झाल्याचे लक्षात आले. अपघात रात्री उशिरा झाल्याने वनविकास महामंडळाचे वनरक्षक वनरक्षक श्री.बुराडे , श्री. स्वामी यांनी तत्परता दाखवून मादी हरणाचे शव ताब्यात घेऊन शव विच्छेदनास नेले, दुसऱ्या दिवशी शव विच्छेदन डॉक्टर पोडसेलवार यांनी केले, शव विच्छेदन करतांना वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.आत्राम, वनरक्षक बुराडे , स्वामी,व हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटी चे अध्यक्ष दिनेश खाटे व सदस्य अंकित बाकडे उपस्थित होते.
Vanvikas mahamandal
चंद्रपूर-मूल हा नॅशनल हायवे क्रमांक ९३० असून जवळपास जंगलातूनच जातो,हा हायवे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (बफर ) क्षेत्राला लागून जातो, चंद्रपूर प्रादेशिक व वनविकास महामंडळ हे जंगल क्षेत्र या हायवे ला लागूनच आहे,म्हणून वन्यजीवांचे हायवे ओलांडताना असंख्य वन्यजीवांचा नाहक बळी गेलेला आहे,राष्ट्रीय महामार्ग प्रशासन च्या दिरंगाई मुळे नाहक वन्यप्राण्यांचा बळी जात आहे, तरीही अजून पर्यंत या हायवे वर वन्यजीवांसाठी उपशमन योजना राबविल्या जात नाही आहे, आणखी किती वन्यजीवांचा बळी गेल्यावर राष्ट्रीय महामार्ग प्रशासन कधी तत्परता दाखवून उपशमन योजना राबवण्यासाठी कधी जाग येणार माहिती नाही.