---------------------------------------------------
विद्यार्थी विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धामणा येथील विद्यार्थीनी कु.रविना तुळशिराम बेहेरे माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा वर्ग १० मार्च २०२२ ला प्रथम क्रमांकाने पास तर कु.दिक्षा राजेश हनवते उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा वर्ग १२ मार्च २०२२ ला प्रथम क्रमांकाने पास झालेल्या विद्यार्थिनिंना सामाजिक कार्यकर्ते संजय खांडेकर यांनी गुरूवार दि. २६ जानेवारी २०२३ रोजी विद्यार्थी विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय कार्यक्रमादर्म्यान भारतीय राज्यघटना संविधान ग्रंथ पारितोषिक म्हणून दिले.
ह्यावेळी मंचावर माजी मुख्याध्यापिका सौ भोयर मॅडम,आजी मुख्याध्यापक श्री पुंजाराम राऊत, कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक श्री.मोहन नागमोते, नागपूर पंचायत समितीचे उपसभापती अविनाशजी पारधी, शिक्षिका विमलताई बेहेरे,पाहूने म्हणून उपस्थित प्रशांत गोमकार इत्यादी उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री पुंजाराम राऊत सरांनी दोन्ही विद्यार्थिनिंना स्म्रुतीचिन्ह दिले व मुलींचा सत्कार केला.
ह्यावेळी दोन्ही विद्यार्थिनींनी विद्यालयातील सर्व कर्मचारी वर्गाचे आभार मानले व भविष्यात आम्ही शिक्षणात प्रगती करून आपल्या विद्यालयाचे नावलौकिक करू असे प्रतिपादन केले.
Nagpur Maharashtra India education news