Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जानेवारी १९, २०२३

रोजगार हमी योजना कर्मचारी संपाला प्रतिसाद ! Employee Strike!





जुन्नर /आनंद कांबळे
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही रोजगाराच्या दृष्टिकोनातून प्रमुख योजना असून ह्या योजनेमध्ये काम करणारे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, लिपिक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी बुधवारी (दि. १८) राज्यात एकदिवशीय संप पुकारला होता. या संपात जुन्नर तालुक्यातील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी , तांत्रिक सहाय्यक व लिपिक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर सहभागी झाले होते. या संपाला जुन्नर तालुक्यातील ११० रोजगार सेवकांनी पाठींबा जाहीर दिला होता. या संदर्भातील मागण्यांचे निवेदन जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस तसेच गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यांना देण्यात आले.


सध्या गावातील होणाऱ्या विकास कामांवर रोजगार सेवकांना ६ टक्के मानधन मिळत असते तर १०-१२ वर्षे काम करूनही सहाय्यक कार्यक्रम अधिकारी , तांत्रिक सहाय्यक व लिपिक यांना मिळणारे मानधन अतिशय तुटपुंजे असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेले हे कर्मचारी मागील दहा - बारा वर्षांपासून प्रामाणिकपणे मग्रारोहयोची कामे करीत आहेत. कोविड काळात नियमित कार्यरत राहून मग्रारोहयो अंतर्गत मजुरांना कामे उपलब्ध करून दिली. अशी परिस्थिती असताना मागील तीन - चार वर्षापासून कंत्राटी कर्मचाऱ्यांना मानधन वेळेवर दिले नाही तसेच वाढवूनही दिले जात नाही. सीएससीमार्फत नियुक्त करण्यात आलेल्या या कर्मचाऱ्यांना किमान वेतन व वैधानिक फायदा दिला जात नाही. त्यामुळे मनरेगांतर्गत स्वतंत्र यंत्रणा तयार करून कर्मचाऱ्यांचे आकृतीबंधामध्ये समायोजन करण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.


सदर मागण्या पूर्ण न झाल्यास २५ जानेवारीपासून असहकार आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. यावेळी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दुर्गेश गायकवाड, तांत्रिक सहाय्यक जितेंद्र भोर, संचित कोल्हे, मयूर डोके, राजू कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.