जूनियर चेंबर इंटरनैशनल चंद्रपुर ऑर्बिटतर्फे "धुम मचाले" या जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धे'चे आयोजन करण्यात आले आहे.
चंद्रपूर: जूनियर चेंबर इंटरनैशनल चंद्रपुर ऑर्बिट व कोरफिट जीम यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २७ जानेवारी २०२३ सायंकाळी ४ वाजतापासून "धुम मचाले" या जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धे'चे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर येथील प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृहात आयोजित "धुम मचाले" या समूह नृत्य स्पर्धे'मध्ये सुमारे ३०० स्पर्धक सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या वर्षी पहिल्यांदा "धुम मचाले" या समूह नृत्य स्पर्धा ३ श्रेणी मध्ये विभागली गेली आहे. पहिली श्रेणी शाळेच्या विद्यार्थ्याकरिता त्यात वर्ग १ ते वर्ग १० चा समावेश असेल, दुसरी श्रेणी १५ वर्षाखालील वयोगटातील खुली स्पर्धा व श्रेणी १५ वर्षावरील वयोगटातील खुली स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे.
जूनियर चेंबर इंटरनैशनल चंद्रपुर ऑर्बिट चे जिल्हास्तरावरील समूह नृत्य स्पर्धेचे चंद्रपूर शहरात पहिल्यांदाच आयोजन होत असून ऑडिशन दिनांक १५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ ते ३ वाजता सरदार पटेल कॉलेज, गंजवार्ड, चंद्रपूर येथे होत असून यामुळे अनेक उदयोन्मुख व प्रतिभावंत मुले व मुलींना व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिकांसह सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येईल. स्पर्धेमध्ये चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आदी जिल्हातून स्पर्धक सहभागी होणार आहेत. स्पर्धेमध्ये जूनियर चेंबर इंटरनैशनल चंद्रपुर ऑर्बिट वतीने महिला सक्षमीकरणासाठी एक विशेष नृत्य सादर करण्यात येणार आहे. या समूह नृत्य स्पर्धेतील विजेत्यांना जूनियर चेंबर इंटरनैशनल चंद्रपुर ऑर्बिट यांच्यातर्फे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.आज चंद्रपूरातील अनेक प्रतिभावंत मुले व मुली विविध डान्स शो तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धांमध्ये सहभागी होवून आपल्या शहराचे नावलौकीक वाढवित आहेत. अशा विविध स्पर्धांमध्ये अनेक प्रतिभावंत नृत्य कलावंत पुढे यावेत यासाठी जूनियर चेंबर इंटरनैशनल चंद्रपुर ऑर्बिट ने पुढाकार घेतला असून यामाध्यमातून अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत पुढे येतील, असा विश्वास जूनियर चेंबर इंटरनैशनल चंद्रपुर ऑर्बिट चे अध्यक्ष जेएफएस अमित पोरेड्डीवार यांनी व्यक्त केला.
"धुम मचाले" या समूह नृत्य स्पर्धेचे मुख्य संयोजक म्हणून जेसी अमीत पडगेलवार, संयोजक जेसी रक्षा नथवानी, प्रकल्प अधिकारी जेसी अमीत वेल्हेकर, प्रकल्प निर्देशक जेसी पंकज नागरकर, जेसी कृष्णा चंदावार, जेसी आकाशदीप ढोबाले, जेसी अथर्व माधमशेट्टीवार, उपाध्यक्ष जेसी विक्रम अरोरा, जेसी सचिन हनवते, मार्गदर्शक जेसी मनीष तिवारी, जेसी सचिन साल्वे, जेसी प्रशांत ठाकरे, महिला सदस्य जेसी पल्लवी चंदावार, जेसी नेहा साल्वे, जेसी श्रद्धा ऐडलावर, जेसी प्रियंका ढोबाले व चेंबर इंटरनैशनल चंद्रपुर ऑर्बिटचे सर्व सदस्य कार्य सफल होण्याकरिता प्रयत्न करीत आहे.