Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जानेवारी ०२, २०२३

भारताच्या नवीन संसद भवनाला चंद्रपूरच्या सागवान लाकडाचा दरवाजा! Make in india Parliament Building Chandrapur

भारताच्या नवीन संसद भवनाला चंद्रपूरच्या सागवान लाकडाचा दरवाजा! Make in india Parliament Building Chandrapur

New Parliament Building


चंद्रपूर : नवीन संसदेची इमारत बांधण्यासंबंधी प्रकल्प म्हणजे सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट होय. (New Parliament Building, New PM Residence & More: Details Of The Revamped Central Vista Avenue) भारताचा प्रशासकीय कारभार दिल्लीतील ल्युटियन्स भागातून चालतो. यात भारताची संसद, राष्ट्रपती भवन आणि इतर सर्व मंत्रालयांच्या इमारती, सचिवालय ही सर्व प्रशासकीय कार्यालयं आहेत. राजपथच्या दोन्ही बाजूंच्या भागाला सेंट्रल व्हिस्टा म्हणतात. या इमारतींव्यतिरिक्त राष्ट्रीय संग्रहालय, नॅशनल आर्काईव्हज, इंदिरा गांधी कला केंद्र, बिकानेर हाऊस, हैदराबाद हाऊस, निर्माण भवन, जवाहरलाल भवन हा सर्व परिसरही सेंट्रल व्हिस्टाअंतर्गत येतो. या संपूर्ण भागाचं पुनर्निमाण करण्यात आलं आहे.  देशातील संसदेच्या नवीन इमारतीसाठी म्हणजे Parliament Building सेंट्रल विस्टासाठी चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील सागवान लाकडाचा वापर केला जात आहे. 


चंद्रपूर हा वनांनी नटलेला जिल्हा आहे. राज्यातील सर्वाधिक जंगल आणि वाघ आहे. या जंगलातील सागवान लाकूड नवीन Parliament Building संसद भवन म्हणजे नवी दिल्ली इथे तयार होत असलेल्या 'सेंट्रल विस्टा'मध्ये वापरण्यात येणार आहे. तसा उल्लेख राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी जेपी नड्डा यांच्या जाहीरसभेत केला. 

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील लाकडामध्ये आढळणारा रिंग आणि ग्रेन पॅटर्न हा देशात सर्वाधिक सुंदर असल्यामुळे या लाकडाची निवड करण्यात आली आहे. किमान 200 वर्ष तो खराब होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मेक इन इंडिया' Make in india संकल्पनेअंतर्गत भारतीय लाकूडच वापरण्याचे निर्देश दिले आणि चंद्रपूर (Chandrapur) च्या सागवानाची निवड करण्यात आली. संसद भवनाच्या इंटिरिअरसाठी बल्लारपूर वनविभागाच्या लाकूड डेपोमधून सागवान खरेदी करण्यात आला.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.