Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जानेवारी १६, २०२३

भूकंप सदृश्य घटनेना पालकमंत्र्यांनी मागविला अहवाल #earthquake #Chandrapur

भूकंप सदृश्य घटनेची वस्तुस्थिती तपासून अहवाल द्या !

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश




चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसराला १५ जानेवारी रोजी जाणवलेल्या भूकंपसदृश्य वस्तुस्थिती तपासण्याचे निर्देश राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले .

बाबूपेठ भागात १५ जानेवारी २०२३ रोजी रात्री ९.३० वाजता भूकंपासारखे धक्के जाणवले होते. यासंदर्भात काही नागरिकांनी ना. मुनगंटीवार यांना अवगत केले. प्रसार माध्यमांमध्येही यासंदर्भातील वृत्त प्रकाशित झाल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना कोणतीही भीती न बाळगण्याचे आवाहन करीत ना. सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी चौकशी करून वस्तुस्थितीजन्य अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

या घटनेत त्या परिसरात काही नुकसान झाले असल्यास त्याची माहिती देखील कळवावी व योग्य ती उपाय योजना करण्याच्या सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या.



https://youtu.be/xqurXNm57nEkhabarbat News

अलीकडील भूकंप
टीप: भूकंपाच्या नवीन अधिकृत अहवालांना कदाचित उशीर होऊ शकतो
भारतीय प्रमाण वेळ मध्ये सर्व वेळा आहेत · स्रोत: U.S. Geological Survey

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.