Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जानेवारी १६, २०२३

वारंवार सूचना देऊनही..... म्हणून ठोकले टाळे | (Chandrapur City Municipal Corporation)

चंद्रपूर (Chandrapur) १६ जानेवारी : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या (Chandrapur City Municipal Corporation) माध्यमातून कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांचे गाळे सील करण्याची कारवाई सुरू आहे. १६ जानेवारी रोजी मनपाच्या कर वसुली व जप्ती पथकाद्वारे  भिवापूर वॉर्डातील मनपा मालकीच्या सुपर मार्केट मधील २ गाळ्यांना सील करण्यात आले.  tax collection



कोणी थकविली रक्कम 

 Super Market at Bhiwapur Ward भिवापूर वार्ड येथील सुपर मार्केट मधील गाळा क्र. ८३०, गाळेधारक अब्दुल रफिक सत्तार शेख यांच्याकडे रुपये ६४२७३/- तर गाळा क्र. ८३८, गाळेधारक प्रशांत पंदीलवार तर्फे गणेश गोरडवार यांचेकडुन रुपये १,९२,६२९/- इतकी रक्कम भाडे स्वरूपात थकीत असल्याने तसेच मालमत्ता धारकाने कर भरणा करण्यासंदर्भात नकारात्मक प्रतिसाद दिल्याने कर वसुली व जप्ती पथकाने मालमत्ता धारकाचे दुकान सील केले. या दोन्ही गाळ्यांवर मालमत्ता कर व अन्य कर थकीत आहे.


कोणी केली कारवाई 

     सदर कारवाई मनपा आयुक्त विपीन पालीवाल (Municipal Commissioner Vipin Paliwal) यांच्या मार्गदर्शनात कर विभाग प्रमुख अनिल घुले (Anil Ghule) यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात मालमत्ता कर पथकाने केली.


A special campaign for tax collection is being implemented through Chandrapur City Municipal Corporation. Action is underway to seal the pockets of shopkeepers who do not pay tax and are evasive despite repeated notices. On January 16, 2 outlets in Municipal Corporation-owned Super Market in Bhiwapur Ward were sealed by Municipal Tax Collection and Seizure Team.

 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.