सावली sawali chandrapur. सावली तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या रस्त्यांची दुरवस्था झालेली होती. हे ग्रा.मा. रस्ते जिल्हा परिषदकडे होते. हा रस्ता रहदारी करण्याकरिता महत्वाचा असल्याने रहदारी करण्याकरिता मोठी अडचण होत होती.
या रस्त्याकडे जिल्हा परिषद प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करीत करीत होते. झे.पी. कडे या रस्त्याच्या समस्या विषयी वारंवार पत्राद्वारे पाठपुरावा या परिसराचे कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक श्री. खुशाल लोडे यांनी मोठ्या प्रमाणात केला. परंतु झे.पी. प्रशासन काही लक्ष द्यायला तैयार नव्हते. श्री. खुशाल लोडे यांनी या रस्त्यांची झालेली दुरावस्था बघता, राज्याचे मंत्री माजी मंत्री तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मान श्री *विजयभाऊ वडेट्टीवार साहेब* यांना या रस्त्यांची समस्या सांगितली. राज्याचे माजी मंत्री मान श्री विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांनी दखल घेत या परिसरातील संपूर्ण रस्ते एम. डी. आर. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरण करण्याचे आदेश दिले त्यानंतर भानापूर फाटा ते उसरपार चक, मंगरमेंढा ते उसरपार तुकुम हे दोन रस्ते सा.बां.विभागाकडे हस्तांतरण होऊन या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम राज्याचे माजी मंत्री तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मान.श्री *. विजयभाऊ वडेट्टीवार* साहेबांच्या प्रयत्नातून खराब झालेल्या रस्त्यांच्या कामाला डांबरीकरण करण्याचे कामाला सुरवात झाली आहे.
राज्याचे माजी मंत्री तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मान.श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून रस्त्यांचे कामाला सर्वात होताच या परिसरातील जनतेनी राज्याचे *माजी मंत्री मान श्री. विजयभाऊ वडेट्टीवार* साहेबांचे आणि या परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री *. खुशाल लोडे* यांचे अभिनंदन केले.
जन सेवा हीच ईश्वर सेवा