चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये दोन वाघांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
Tadoba andhari Tiger
ताडोबाच्या बफर झोनअंतर्गत येणाऱ्या शिवनी वनपरिक्षेत्रांतर्गत वाघाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या वाघाचा मृत्यू 20-२५ दिवसा अगोदर झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृतावस्थेतील वाघ खूप दिवसापासून पडून होता. वनरक्षक आणि कर्मचाऱ्यांना तो दिसला. त्यांनी वरिष्ठांना कळवलं. त्यानुसार वरिष्ठांनी भेट दिली आणि पंचनामा केला. 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी मृतदेह आढळला. मात्र संध्याकाळ झाल्याने शवविच्छेदन होऊ शकेल नाही. आज एक डिसेंबर रोजी दुसऱ्या दिवशी अगदी पहाटे दहन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी ताडोबा अंधारी बफर प्रकल्प क्षेत्राचे उपसंचालक कुशाग्र पाठक, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणचे प्रतिनिधी, इको प्रो अध्यक्ष बंडू धोत्रे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी मुकेश भांदककर, वनपरिक्षेत्र अधिकारी तुपे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ कुंदन कोडसेलवार, सिंदेवाही येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरपाम यांनी वाघाचे घटनास्थळी दहन करण्यात आले. वन विभागाने वाघाच्या मृत्यूची आकस्मित नोंद करीत पुढील तपास सुरू ठेवला आहे.
Two tigers died in Chandrapur district
दुसऱ्या घटनेत आज सकाळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहरली (Mohurli) वनपरिक्षेत्र येथे आगर्झरी वाघाच्या मृत बझड्या आढळला. तो अंदाजे पाच ते सहा महिन्याचा असावा, असा शक्यता आहे. मोठ्या वाघाच्या हल्ल्यामध्ये तो मारला गेला असावा, असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. यावेळी
सहाय्यक वनसंरक्षक बापू येडे, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणचे प्रतिनिधी बंडू धोत्रे, प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव याचे प्रतिनिधी मुकेश भांदककर, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ कुंदन कोडसेलावर यांची उपस्थिती होती. या वाघाला ताब्यात घेऊन चंद्रपूर येथील वन विभागाच्या ट्रांजिट ट्रिटमेंट सेंटर येथे आणण्यात आले. डॉ. कुंदन कोडसेलावार, डॉक्टर संजय बावणे यांनी त्याच्यावर शवविच्छेदन करून वैद्यकीय तपासणी केली. यावेळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉक्टर जितेंद्र रामगावकर, सहाय्यक वनसंरक्षक महेश खोरे, सहायक वनसंरक्षक बापू येडे, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थीपे यांची उपस्थिती होती.