स्वच्छ जल से सुरक्षा अभियानाचा जिल्हा स्तरीय शुभारंभ
गावक-यांच्या सहभागातुन अभियान राबवावे - विवेक जॉन्सन
चंद्रपुर (प्रतिनिधी)दिनांक 01/12/2022
"स्वच्छ जल से सुरक्षा अभियान" दिनांक 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2022 या कालावधित देशभर राबविण्यात येत असुन चंद्रपुर जिल्हा परिषद अंतर्गत नुकताच अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ केलेला आहे. शासकीय योजनांची विविध अभियान जर गावस्तरावर यशस्वी करायची असेल तर गावक-यांच्या सहभगाशिवाय पर्याय नसुन , गावक-यांच्या सहभागातुन स्वच्छ जल से सुरक्षा अभियान जिल्हातील प्रत्येक गावात राबवावे . असे आवाहन जिल्हास्तरीय कार्यक्रमात जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता मंगेश आरेवार यांनी केले. आरेवार यांनी आपल्या प्रास्ताविकातुन अभियान चंद्रपुर जिल्यात कसे राबवायचे व त्याचे महत्व याबाबत माहीती दिली. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणुन जिल्हा परिषदचे अतीरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षा गौरकर उपस्थित होत्या. "स्वच्छ जल से सुरक्षा अभियान" जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी पाणी पुरवठा विभाग व आरोग्य विभाग यांनी समन्वयातुन या अभियानाच काम करावे असे मत सौ.वर्षा गौरकर यांनी व्यक्त केले. पाणी गुणवत्ता तज्ञ अंजली डाहुले यांनी अभियाना बाबतचे सादरीकरण केले. कार्यक्रमाला पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता, बीआरसी, संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. माहीती शिक्षण संवाद तज्ञ प्रविण खंडारे, कृष्णकांत खानझोडे, अंजली डाहुले, प्रफ़ुल मत्ते ,साजिद निजामी, तृशांत शेडे,नरेन्द्र रामटेके, भारती करसाल, बंडु हिरवे,दानप्पा फ़ाये, मनोज डांगरे ,स्नेहा रॉय, श्रध्दा जयस्वाल, उपअभियंता आत्राम, शामकुवर,योगिता ठेंगणे उपस्थित राहुन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रकाश उमक यांनी केले.