चंद्रपूरच्या हॉस्पिटलमध्ये पैसे घेतल्याचा धक्कादायक व्हिडिओ
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार सुरू असताना चंद्रपूरच्या डॉक्टर वासाडे यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांकडून पाच हजार रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार एका व्हिडिओमध्ये काय झाला आहे. सदर व्हिडिओ मयूर राईकवार याांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये शेअर ( Facebook Post) केला असून, तो video खाली बघू शकता.
शासकीय योजनेतून उपचार होत असताना जी शस्त्रक्रिया सामग्री दर्जेदार नसते जर आपल्याला चांगली साहित्य हवे असेल तर वरचे पैसे द्यावे लागतील, अशी थाप मारून पैसे उखळण्याचा प्रकार या व्हिडिओच्या माध्यमातून उघड झाला आहे.
चंद्रपुरातील आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार (Mayur Raikwar) यांनी प्रत्यक्ष रुग्णाच्या नातेवाइगासोबत जाऊन झालेला प्रकार आपल्या मोबाईल मध्ये कैद केला.
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana of Government of Maharashtra
महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे. या अंतर्गत राज्यातील जनतेला विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल वर्गातील नागरिकांसाठी ही आरोग्य योजना आहे. या योजनेअंतर्गत शासनाने निर्धारित केलेल्या शासकीय निमशासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये गंभीर आजाराच्या रुग्णांना विमा संरक्षण देऊन मोफत वैद्यकीय सुविधांचा लाभ दिला जातो ही योजना राबविताना रुग्णांच्या नातेवाईकांना कोणताही आर्थिक बोजा पडू नये आणि आरोग्य विषयक त्यांची समस्या दूर व्हावी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे असे असताना देखील काही खाजगी रुग्णालयाच्या माध्यमातून ही योजना राबविताना रुग्णांच्या नातलगांकडून पैसे उकडण्याचा प्रकार नेहमीच घडत असतो मात्र आरोग्याच्या बाबतीत नको किंवा डॉक्टर विरोधात तक्रार कशाला म्हणून अनेक रुग्णांची नातेवाईक पुढे येत नाही किंवा त्याबाबत अधिकृतरित्या बोलत नाहीत. रुग्णातून पैसे उघडण्याचा हा प्रकार नेहमीच घडत असला तरी अनेक रुग्णांच्या नातेवाईकांकडे पुरावे नसतात सबळ पुराव्या अभावी अनेकदा चौकशी होऊ नये कारवाई होत नाही. त्यामुळेच या प्रकरणाच्या माध्यमातून सबळ पुरावा म्हणून आता मोबाईल व्हिडिओ असल्याने कारवाईची आम् आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी केली आहे.
पाच हजारांची रक्कम घेताना या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ती ऑनलाईन पद्धतीने घेण्यास नकार दिला. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी जवळच्या एटीएममध्ये जाऊन रोख काढली. त्यानंतर ती त्या कर्मचाऱ्यांना जाऊन दिली. तेव्हा रक्कम दिल्याची पावती देण्याची त्यांनी मागणी केली असता त्यांनी चक्क नकार दिला. आपले रुग्ण हे महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार घेत असल्याने अशी पावती देता येत नाही असेही त्यांनी बतावणी केली. इतकेच नव्हे तर आपल्या रुग्णाला चांगली शस्त्रक्रिया सामग्री हवी असेल तर ही पाच हजार रुपये द्यावेच लागतील, असे त्यांनी सांगितले. शासनाकडून उपचाराच्या मोबदल्यात देण्यात येणारे रक्कम कमी असते, शासनाकडून अनेकदा येणारा हा मोबदला खूप उशिरा येतो. त्यामुळे रुग्णालयांना ते परवडत नाही. शिवाय शासनाकडून या योजनेअंतर्गत जी शस्त्रक्रिया सामग्री दिली जाते, ती निकृष्ट दर्जाचे असते. त्यामुळे आपल्याला चांगली सामुग्री पाहिजे असल्यास वरचे पैसे द्यावे लागतील, अशी बतावणी या कर्मचाऱ्यांनी केल्याचे या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे.
*डॉक्टरवर गुन्हा दाखल करून हॉस्पिटलचा परवाना रद्द करा*
जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून गरीब रुग्णांची फसवणूक करणाऱ्या आणि त्यांच्याकडून पैसे लुबाडणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करून त्यांचा हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यात यावा याशिवाय या योजनेअंतर्गत आतापर्यंत झालेले उपचाराचे ऑडिट करून किती रुग्णांकडून पैसे घेतले याचेही अहवाल तयार करण्यात यावा अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे या संदर्भात आम आदमी पार्टीने राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना निवेदन देखील पाठविले.
*रुग्णांच्या नातलगांनी पुढे यावे*
चंद्रपूर शहरात किंवा जिल्ह्यात कोणत्याही हॉस्पिटल नाही योजनेच्या नावाखाली जर पैसे घेतले असतील त्या अशा रुग्णांच्या नातेवाईकांनी आम आदमी पार्टीकडे तक्रार करावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.