Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, डिसेंबर २६, २०२२

पोलीस भरतीसंदर्भात खासदारांचे पोलीस अधीक्षकांना पत्र Police recruitment

चंद्रपूर जिल्ह्यात युवकासांसाठी मार्गदर्शन शिबीर घ्या


चंद्रपूर : हा जिल्हा नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. येथील युवक बेरोजगार मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या प्रतीक्षेत आहे. आता अनेक वर्षानंतर पोलीस भरतीमध्ये नोकरी करण्याची संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील युवकांना मार्गदर्शनाकरिता 'खाकी'ने पुढे येण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. (balu Dhanorkar) 

Recruitment - Maharashtra State Police



जिल्ह्यात शहरी भागासोबत ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात आहे. येथील युवकांना सर्वच प्रकारचे कौशल्य आहेत. मात्र, रोजगाराच्या संधी नसल्याने मागे राहत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस भरतीमध्ये युवकाना संधी मिळावी, याकरिता चंद्रपूर येथील पोलीस दलाने पुढाकार देण्याची गरज आहे. पोलिसांची युवकांमध्ये भीती न वाटता तो आपल्या समाजातील एक घटक आहे. आपण देखील त्यांच्यासारखंच काम करण्याची उर्मी युवकांमध्ये येण्याची गरज आहे. त्याकरिता जिल्ह्यातील विशेषतः ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यात लगतच्या गावातील युवकांना तालुकास्तरीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्याची नितांत आवश्यकता आहे.

MP's letter to Superintendent of Police regarding police recruitment

ग्रामीण भागातील युवकांकरिता त्या ठिकाणच्या ठाणेदाराची मदतीने पोलीस भरती कार्यक्रम राबवावा, त्यासोबतच जिल्हास्तरावर देखील मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पत्राच्या माध्यमातून केली आहे. 

balu Dhanorkar | 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.