Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, डिसेंबर ३०, २०२२

आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या; ६ महिन्यात बिघडली प्रकृती | MLA Pratibha Dhanorkar

६ महिन्यात बिघडली महाराष्ट्राची प्रकृती 

आमदार प्रतिभा धानोरकर यांचा शिंदे- फडणवीस सरकारवर घणाघात 


चंद्रपूर । महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यापासून महाराष्ट्रातील शेतकरी, कर्मचारी, कष्टकरी, सर्वसामान्य जनता मागील ६ महिन्यापासून त्रस्त आहे. या काळात महापुरुषाचे अपमान संपूर्ण देश बघत आहे. सर्वोच्च पदावर असणारी व्यक्ती शिवराय, महात्मा फुले, सावित्री फुले यांचा अवमान करीत आहे. ही घटना लज्यास्पद असल्याचे प्रतिपादन करीत आमदार प्रतिभा धानोरकर (MLA Pratibha Dhanorkar) यांनी जाहीर निषेध केला. 

आमदार प्रतिभा धानोरकर


महाराष्ट्रात होत असलेला अवमान थांबविण्यासाठी आणि सन्मान मिळवून देण्यासाठी महात्मा फुले, सावित्री फुले यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार प्रस्तावित होता. तो अद्याप मिळाला नाही. तो देण्यात यावा, यासाठी महाराष्ट सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर MLA Pratibha Dhanorkar यांनी सभागृहात केली. यावेळी त्या म्हणाल्या की, २०१४ पूर्वी शाळेत शिकत असताना सागरा प्राण तळमळला ही कविता उत्साहाने म्हणत होतो, मात्र आज महापुरुषांचे होणारे अपमान बघून मागील ८ वर्षातील सरकार जबाबदार आहे का, याचा विचार व्हावा. मागील ६ महिन्यात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अतिशय बिघडलेला आहे. चंद्रपूर व जिल्ह्यातील गांजा व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात पोलिसांनी मोठी कामगिरी केली. अनेक आरोपीना जेरबंद केले. रेल्वेतून लहान बालकांची होणारी विक्री पोलिसांच्या सतर्कतेने उघडकीस आली. या बद्दल आमदार धानोरकर यांनी पोलिसांचे अभिनंदन केले. 


पुढे त्यांनी सांगितले कि, मागील वर्षभरात विधानसभेत वरोरा येथे ४४ घटना, तर भद्रावती तालुक्यात ७ महिला अत्याचाराच्या घटना घडल्या. महिला अत्याचार आणि कौटूंबिक अत्याचाराच्या घटना कमी करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला मानसोपचार तज्ज्ञाची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी आमदार धानोरकर यांनी केली. सुमठाना येथे गर्भवती महिलेने पोटातील बाळासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. महिलांना असे टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे, याचा विचार व्हावा, याकडे लक्ष वेधले.     



विदर्भ 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.