*महाराष्ट्रातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत रखडलेली कामे तात्काळ पूर्ण करा*
*खासदार बाळू धानोरकर यांनी घेतली केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीराज सिह यांची भेट*
*सोमवारी महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या सेक्रेटरीसोबत दिल्ली येथे आढावा बैठक*
चंद्रपूर : चंद्रपूर- वणी - आर्णी लोकसभा क्षेत्रातील रखडलेल्या योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी खासदार बाळू धानोरकर हे नेहमी आग्रही असतात. आज देखील महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत रखडलेले कामे तात्काळ पूर्ण करण्यासाठी त्यांनी दिल्ली येथे केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीराज सिह यांची भेट घेतली. याबाबत सोमवारी दिल्ली येथे सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या सेक्रेटरीसोबत बैठक घेऊन सर्व विषय मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी मंत्री महोदयांनी दिले. MP Balu Dhanorkar | Pradhan Mantri Gram Sadak Yojana in Maharashtra
आज दिल्ली येथे केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीराज सिह यांची भेट यावेळी खासदार सुनील तटकरे व खासदार विनायक राऊत यांची उपस्थिती होती. यावेळी विशेषतः चंद्रपूर - यवतमाळ हे दळणवळणाच्या सोयी सुविधेमध्ये मागे आहेत. त्यामुळे व्यापार व उद्योगांना वाहतुकीसाठी नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे या जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे निर्माण होणे गरजेचे आहे. त्याकरिता खासदार बाळू धानोरकर हे नेहमी आग्रही असतात. Pradhan Mantri Gram Sadak Yojana in Maharashtra
या दोन जिल्ह्यातील प्रस्तावित रस्ते मंजूर होऊन त्यांना निधी मिळाल्यास मोठ्या प्रमाणात नागरिकांना वाहतूक करण्यास सोईचे होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही सह अन्य ठिकाणी तसेच यवतमाळ जिल्ह्यातील अनेक कामे प्रस्तावित आहेत. परंतु पाठपुरावा अभावी ते कामे तशीच रखडलेली आहेत. त्यामुळे आज केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीराज सिह यांची भेट घेऊन हि कामे मार्गी लावण्याची विनंती केली. हि कामे तात्काळ मार्गी लावणार असल्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी खासदार बाळू धानोरकर यांना दिले. Pradhan Mantri Gram Sadak Yojana in Maharashtra