Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, डिसेंबर १७, २०२२

चंद्रपूरच्या नक्षल समर्थक तरुणाला आठ वर्षे सक्तमजुरी | Naxal Maoist supporter Chandrapur


चंद्रपूरच्या नक्षल समर्थक तरुणाला आठ वर्षे सक्तमजुरी
चंद्रपूरच्या नक्षल समर्थक तरुणाला आठ वर्षे सक्तमजुरी


Pune ATS court sentences Maoist operative Arun Bhelke to 8 years in jail


चंद्रपूर पोलिसांनी २००८ मध्ये नक्षलविरोधी कारवाईत १० जणांना अटक केली होती. त्यावेळी चीनी बनावटीचे एक कार्बाईन गन व १३० काडतुसे जप्त केली होती. अटक केलेल्यात अरुण भेलके व त्याची पत्नी कांचन यांचाही समावेश होता. परंतु, जामीन मिळाल्यापासून हे दोघे फरार होते. भेलके हा नाव बदलून पुण्यात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावेळी २०१४ मध्ये पुणे एटीएसच्या पथकाने त्याचा शोध घेऊन कासेवाडी भागातून सापळा रचून अटक केली.

A special ATS court in Pune on Wednesday convicted and sentenced alleged urban naxal operative Arun Bhanudas Bhelke (46) to eight years ...

चाकण परिसरातून २०१४ मध्ये अरुण भेलके उर्फ आदित्य पाटील आणि त्याची पत्नी कांचन उर्फ सोनाली पाटील (वय ३३) यांना दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली होती. दोघांच्या विरोधात बेकायदा प्रतिबंधक हालचाल (यूएपीए) कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून भेलके येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याची पत्नी कांचन हिचा दीर्घ आजाराने ससून रुग्णालयात मृत्यू झाला. कांचनला ह्दयविकाराचा त्रास होता. आता अरुण भेलके याला विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी आठ वर्षे सक्तमजुरी आणि ४२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Eight years of hard labor for Naxal supporter youth of Chandrapur

Pune, 14th December 2022: A special court today sentenced Arun Bhanudas Bhelke (46), a resident of Chandrapur district in Maharashtra. 







SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.