*माजी मंत्री वडेट्टीवार यांनी वेधले लक्ष
*दोषी अधिकारी व कंत्रादारांवर होणार कारवाई
चंद्रपूर येथील म्हाडा अंतर्गत सुरु असलेले एसटीपी प्रकल्पातील मलनिस्सारण गटार वाहिनी बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असून यात मानाचे अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याबाबत राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार यांनी आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत एसटीपी प्रकल्पातील बांधकामाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करत कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आश्वासन दिले.
तत्पूर्वी नविन चंद्रपूर म्हाडा परिसरातील ५३ कोटी २९ लाख २२ हजार रुपयांच्या मलनिस्सारण गटार वाहिनी व एसटीपी २४ एमएलडी व ८ एमएलडी या म्हाडा अंतर्गत कामात निकृष्ठ दर्जाची सामग्री वापरण्यात येत येत असून म्हाडाचे अधिकारी कंत्राटदाराच्या भ्रष्टाचारात सहभागी असल्याने निकृष्ट कामाची पाठराखण करीत असल्याचा आरोप करित या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी ६ जुनपासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. आठ दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाची राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते व माजी चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दखल घेत जिल्हा प्रशासनाने उच्च स्तरीय चौकशी समिती गठीत करून समितीने १५ दिवसात तक्रारदार बेले यांनी आक्षेप घेतलेल्या प्रत्येक मुद्दा बाबत सखोल चौकशी, तपासणी करून याबाबत लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना त्यावेळेस दिले होते.
यावरून तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी त्रीसदस्य समितीचे गठण करून शासकीय अभियांत्रिकी विद्यालयामार्फत योग्य चौकशी करून अहवाल सादर केला होता. आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री ,काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी म्हाडा अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगणमताने एसटीपी प्लांट अंतर्गत मलनिस्सारण गटार वाहिनी बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याबाबत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज तारांकित प्रश्न उपस्थित करून पोलखोल करत संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधले. यावर उत्तर देत राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी म्हाडा अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई तर कंत्राटदारांना काळा यादी टाकण्याचे आश्वासन दिले. सलग पाठपुरावा व अभ्यासु वृत्तीने प्रकरण उपस्थित करणारे राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते ,आ. विजय वडेट्टीवार यांचे सभागृहात टाळ्यांच्या गडगडाटाने स्वागत करण्यात आले.