Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, डिसेंबर १९, २०२२

चंद्रपुरात पुन्हा आढळले शिळे अन्न; मनपाने केली मोठी कारवाई | chandrapur municipal corporation

 जेलच्या मागील भागात शिळे अन्न; कॅटरर्सला १० हजारांचा दंड


चंद्रपुरात पुन्हा आढळले शिळे अन्न; मनपाने केली मोठी कारवाई | chandrapur municipal corporationचंद्रपुरात पुन्हा आढळले शिळे अन्न; मनपाने केली मोठी कारवाई | chandrapur municipal corporation

चंद्रपूर १७ डिसेंबर -  चंद्रपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने जेलच्या मागील भागात उघड्यावर शिळे अन्न फेकुन कचरा केल्याने संबंधीत कॅटरर्स कडुन १० हजार रुपयांचा दंड तर सार्वजनिक रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवणाऱ्या नागरिकांकडून २ हजार रुपये दंड वसुल केला आहे. संबंधीतांकडुन दंड वसुल करून पुन्हा सदर कृती न करण्याची ताकीद सुद्धा देण्यात आली आहे.   chandrapur municipal corporation
      यापुर्वीही अश्या प्रकारची दंडात्मक कारवाई चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे व विभागामार्फत सातत्याने उपद्रवी घटकांवर नजर ठेवण्यात येते. मात्र या घटनांची पुनरावृत्ती बघता स्वच्छतेप्रती आपली मानसिकता बदलण्याची गरज निश्चितच वाटते. स्वच्छता ही स्वच्छता कर्मचाऱ्यांइतकीच आपलीही जबाबदारी आहे याचे भान ठेवणे आवश्यक आहेत. दंड ठोठावणे नाही तर स्वच्छतेचे पालन व्हावे हा यामागचा हेतू आहे. स्वच्छता विभागामार्फत दररोज सकाळ संध्याकाळ झडाई करून शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला जातो मात्र काही उपद्रवी तत्वांद्वारे सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणे, सार्वजनिक ठिकाणी बांधकाम साहित्य ठेवणे हे प्रकार केले जातात. स्वच्छतेची सवय लावुन महानगरपालिकेच्या प्रयत्नांना योग्य तो सहयोग करण्याचे चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.  
chandrapur municipal corporation

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.