Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, डिसेंबर २७, २०२२

चंद्रपुरात बीसीसीआयची क्रिकेट अकॅडमी होणार | bcci cricket academy sudhir mungantiwar.




जिल्हा क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅकच्या लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी केली होती मागणी

bcci cricket academy sudhir mungantiwar.
चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणांना खेळात नैपुण्य प्राप्त करण्याच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध व्हाव्यात, बौद्धिक क्षमतेबरोबरच शारीरिक क्षमता साधता यावी, तसेच क्रीडा क्षेत्रात आपले नावलौकिक प्राप्त करता यावे, यासाठी सर्व सोयी सुविधायुक्त क्रीडांगणाची निर्मिती करण्यात आली आहे. याची फलश्रुती म्हणून जिल्ह्याचा गौरव वाढविण्यासाठी क्रीडा संकुलाच्या माध्यमातून जिल्ह्यात आतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात लवकरच बीसीसीआयची क्रिकेट अॅकॅडमी निर्माण करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा केली.

The Board of Control for Cricket in India (BCCI) is the governing body for cricket in India. It operates a number of cricket academies across the country to promote and develop the sport at the grassroots level. These academies provide training and coaching to aspiring cricketers, and often have state-of-the-art facilities and experienced coaches on staff. The goal of the BCCI cricket academies is to identify and nurture talented young cricketers, and to help them develop the skills and knowledge they need to succeed at the highest levels of the sport.

चंद्रपूर येथे बी.सी.सी.आय. क्रिकेट अकादमी सुरू करण्याची मागणी माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी जिल्हा क्रीडा संकुल येथील कार्यक्रमात केली होती. bcci cricket academy sudhir mungantiwar.
या मागणीला दाद देवून लोकनेते विकासपुरुष ना. सुधीर मुनगंटीवार त्यावर चंद्रपुरात सुद्धा बी.सी.सी.आय. ची क्रिकेट अकादमी करनार असल्याची ग्वाही दिली. त्यासाठी त्यांचे मित्र मुंबईचे आमदार आशीष शेलार यांच्याशी ना. मुनगंटीवार यांनी चर्चा केली आहे.चंद्रपुरात सुद्धा आता आंतरराष्ट्रीय स्तराचे क्रिकेट पटू तयार होणार अश्या प्रकारचा आशावाद राहुल पावडे यांनी यानिमित्ताने व्यक्त केला. 
National Cricket Academy Information

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.