चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर वन परिक्षेत्रात कारवा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५०० मध्ये ५ मोर मृतावस्थेत आढळून आलेे.
5 peacocks were found dead in Karwa zone in Ballarpur forest range of Chandrapur district.
बल्लारपूर वन विभागात घनदाट जंगल आहे. या वन परिक्षेत्रातील कारवा गाव जंगलाने वेढले आहे. यामुळे या परिसरात वन्य प्राणी व पशु-पक्षी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. नागरिकांना भूरळ घालणारे वन्यप्राणी व विविध प्रकारचे पक्षी यामुळे बल्लारपूर वन विभागाने कारवा जंगल सफारी सुरु केली आहे. या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढली आहे. पर्यटकांना भूरळ घालणारे मोर याच परिसरात मृतावस्थेत आढळले. ही घटना १३ डिसेंबर रोजी वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी गस्त करीत असताना उघडकीस आली आहे.
बल्लारपूर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाचही मोर ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी वन्य जीव उपचार केंद्रात पाठविले आहेत. मोरांच्या उत्तरीय तपासणीचा रासायनिक विश्लेषक जिल्हा न्याय सहायक, वैद्यकीय प्रयोगशाळा, नागपूर येथून अहवाल प्राप्त झाल्यानंतर मोरांच्या मृत्यूंचे नेमके कारण समोर येईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.