Chandrapur: Jode Maro Andolan
चंद्रपूर (22/11/2022) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचा निषेध नोंदवून जोडे मारो आंदोलन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले. Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) Mahila Aghadi.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना त्वरित पदावरून हटवा तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी (Governor Bhagat Singh Koshyari and BJP National Spokesperson Sudhanshu Trivedi ) यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी करीत कोश्यारी व त्रिवेदी यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला. यापूर्वी कोश्यारी यांनी महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य केले होते. आता सुद्धा राज्यपाल कोश्यारी आणि भाजपचे त्रिवेदी यांनी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत, असा संताप महिला आघाडीने व्यक्त केला.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडी जिल्हा संघटीका उज्वला नलगे, उपजिल्हा संघटीका विद्या ठाकरे, शहर संघटीका वर्षाताई कोठेकर, उपशहर संघटिका किरणताई जुनघरे, विधानसभा समन्वयक बबली पारोही, उपशहर संघटिका अर्चनाताई हेमने, उपशाखाप्रमुख मायाताई पुसाम, शाखाप्रमुख भावना पाटील, सुनीता खराटे, वंदना मांडेकर, अनु खान, टोकलवार ताई, कल्पनाताई आदींची उपस्थिती होती.
Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) Mahila Aghadi District Sanghtika Ujwala Nalge, Up-District Sanghtika Vidya Thackeray, City Sanghtika Nashdai Kothekar, Sub-city Sanghtika Kirantai Junghare, Legislative Assembly Coordinator Babli Parohi, Sub-city Sanghtika Archanatai Hemane, Sub-branch Chief Mayatai Pusam, Branch Chief Bhavna Patil, Sunita Kharate, Vandana Mandekar, Anu Khan, Tokalwar Tai, Kalpantai etc were present.