संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१५ नोव्हेंबर:-
सम्राट अशोक विद्यालय उमरी येथे ग्रामपंचायत सावरटोल्याच्यावतीने दि.१५ नोव्हेंबर रोज मंगळवार ला दुपारी १.०० वाजता बाल सभेचे आयोजन करण्यात आले होते.
बालसभेच्या अध्यक्षस्थानी सावरटोला ग्रामपंचायतचे सरपंच युवराज तरोणे हे होते.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एस. टेंभुर्णे, ग्रामसेवक एस.व्ही. बडोले,जे.एस. हटवार उपस्थित होते.
सभेमध्ये ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांच्या गरजा,आवश्यकता,
मागण्या तसेच आरोग्य, स्वच्छ पिण्याचे पाणी, बालविवाह, बालमजुरी,बालकांचे शोषण,पिळवणूक,बालहिंसा यापासून संरक्षण करण्याच्या उपाययोजना, पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या सुविधा व पुढील शिक्षणाची व्यवस्था, गावातील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांच्या पोषणावर,मूल्यमापन करून आवश्यक ती उपाययोजना करणे आदि विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बालसभेत वरील विषयांवर विद्यालयातील मुला-मुलींचे अभिप्रायही जाणून घेण्यात आले. बालसभेला विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.
उपस्थितांचे आभार विद्यालयाच्या वतीने शिक्षक एस.व्ही. बडोले यांनी मानले.
सभा यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत परिचर भागवत मुनेश्वर,बि.आर.पंचलवार यांनी सहकार्य केले.