Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, नोव्हेंबर १३, २०२२

गांधींमुळे प्रसिद्धीस आलेली कलावती सध्या काय करतेय?


शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील कलावती बांदूरकर या शेतमजूर महिलेची सतरा वर्षांपूर्वी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भेट घेतली होती. सध्या राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी यवतमाळ जिल्ह्यातल्या जळका गावी जाऊन कलावती बांदुरकर (Kalawati Bandurkar) यांची भेट घेतली.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील कलावती बांदुरकर कापूस वेचण्याचे काम करतात. 2005 मध्ये त्यांचे पती परशुराम बांदुरकर यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांना भेट दिली. त्यानंतर त्यांना मदतीचा देखील सुरू झाला आणि यवतमाळ (yavatmal) जिल्ह्यातला जळका गाव प्रसिद्ध आला. या घटनेला सतरा वर्ष पूर्ण झाली आहेत. दरम्यान राहुल गांधी महाराष्ट्रात असल्याच्या पार्श्वभूमीवर काही माध्यमांनी कलावती बांदुरकर सध्या काय करतेय? असा प्रश्न उपस्थित केला.


यानिमित्त चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी बांदुरकर कुटुंबियांची भेट घेतली. त्यांच्या आयुष्यातील अनेक खडतर प्रवासाविषयी जाणून घेतले आणि असलेल्या समस्यांविषयी देखील चर्चा केली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.